टिकटॉक व्हिडीओसाठी धावत्या ट्रेनमध्ये स्टंट, रेल्वे पोलिसांकडून तरुणांची धरपकड

ठाणे : सध्याच्या तरुणाईमध्ये मोबाईलमधील सेल्फी व टिकटॉक अॅपची क्रेझ वाढताना दिसत आहे. त्यासाठी हे तरुण वाटेल तो धोका पत्करण्यास तयार असल्याचे नेहमीच समोर येते. असाच काहीसा प्रकार ठाणे ते मुंब्रा रेल्वेमार्गावर घडला. ठाणे-मुंब्रा रेल्वेमार्गावरील नव्या रेल्वे पुलाचा आधार घेत काही तरुण सेल्फी आणि टिकटॉक व्हिडीओ बनवत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे सुरक्षा दलाने …

Railway Stunt, टिकटॉक व्हिडीओसाठी धावत्या ट्रेनमध्ये स्टंट, रेल्वे पोलिसांकडून तरुणांची धरपकड

ठाणे : सध्याच्या तरुणाईमध्ये मोबाईलमधील सेल्फी व टिकटॉक अॅपची क्रेझ वाढताना दिसत आहे. त्यासाठी हे तरुण वाटेल तो धोका पत्करण्यास तयार असल्याचे नेहमीच समोर येते. असाच काहीसा प्रकार ठाणे ते मुंब्रा रेल्वेमार्गावर घडला.

ठाणे-मुंब्रा रेल्वेमार्गावरील नव्या रेल्वे पुलाचा आधार घेत काही तरुण सेल्फी आणि टिकटॉक व्हिडीओ बनवत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) छापा मारून दोन तरुणांना ताब्यात घेतले. मुकसिद इब्राहिम मुकादम आणि मोह. कासीम सय्यद (रा. मुंब्रा, बॉम्बे कॉलनी) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

धावत्या रेल्वेमधून बाहेर लटकणाऱ्या आणि स्टंट करणाऱ्यांविरोधात रेल्वे पोलिसांची कारवाई नेहमीच सुरु असते. मात्र, तरीही काही तरुण नवनवे साहसी फंडे अवलंबित असतात. आरपीएफकडे ठाणे ते मुंब्रा दरम्यान बांधकाम सुरु असलेल्या लोखंडी पुलावर काही तरुणमंडळी सेल्फी काढत असल्याच्या आणि आपला टिकटॉक व्हिडीओ बनवत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार आरपीएफने आज अचानक छापा मारून कारवाई केली, अशी माहिती आरपीएफचे पोलीस निरीक्षक ए.के. यादव यांनी दिली.

पाहा व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *