जीवघेणी स्टंटबाजी, एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी

मुंबई : आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. अनेक व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. मात्र आता मुंबईतील प्रभादेवीतल्या एका मुलाने उंच इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारल्याचा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलाय. कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. स्टंट आणि तेही उंच इमारतीवरून हे काही लोकांसाठी नवीन नाही. कारण त्यांचा …

, जीवघेणी स्टंटबाजी, एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी

मुंबई : आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. अनेक व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. मात्र आता मुंबईतील प्रभादेवीतल्या एका मुलाने उंच इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारल्याचा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलाय. कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे.

स्टंट आणि तेही उंच इमारतीवरून हे काही लोकांसाठी नवीन नाही. कारण त्यांचा नेहमीचा सराव असतो. पण असाच एक स्टंट मुंबईतील प्रभादेवी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटीतला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हा हा स्टंट पाहू शकता.

इमारतीच्या छतावर काही मुलं दिसत आहेत. इथे एक मुलगा उभा आहे, त्याच टेरिसवर आणखी दोन मुलं एका कडेला बसलेले आहेत. एक मुलगा, जो दुसऱ्या इमारतीवरून कदाचित व्हिडिओ शूट करतोय. जो मुलगा इमारतीवर उभा आहे, तो पळत येतो आणि उडी मारतो.

हा व्हिडीओ कुणाच्याही अंगावर शहारे आणणारा आहे. कारण, थोडीही उडी चुकली असती तर या मुलाचा जीव गेला असता. त्यामुळे जीव घेणारी स्टंटबाजी न करणं आणि ती कुणी करत असेल तर त्याला रोखणं हे आपलं कर्तव्य आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *