जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचं निलंबन कायम

मुंबई : सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विधानपरिषदेतील भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन कायम ठेवण्यात आलं आहे. अवघ्या एका तासाआधी विधान परिषदेत परिचारकांवरील निलंबन मागे घेण्यात आलं होतं. मात्र, परिचारक यांच्या निलंबनानंतर विधान परिषदे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावर आक्षेप घेतला. धनंजय मुंडे यांनी …

जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचं निलंबन कायम

मुंबई : सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विधानपरिषदेतील भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन कायम ठेवण्यात आलं आहे. अवघ्या एका तासाआधी विधान परिषदेत परिचारकांवरील निलंबन मागे घेण्यात आलं होतं. मात्र, परिचारक यांच्या निलंबनानंतर विधान परिषदे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावर आक्षेप घेतला. धनंजय मुंडे यांनी या निर्णयाचा विरोध केला तर रावतेंनी सभापती रामराजेंच्या दालनात जाऊन आक्षेप नोंदवला. तसेच आमदार विनायक मेटेंनीही यावर विरोध दर्शवला. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशांत परिचारक यांचं मागे घेतलेलं निलंबन कायम ठेवण्यात आलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील भोसे यांच्या प्रचारसभेत विरोधकांवर टीका करताना सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत परिचारक यांनी अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधान केलं होतं. “पंजाबमधील जवान वर्षभर सीमेवर असतो आणि त्याची बायको इकडे गर्भवती होते. तुम्हाला मुलगा झाला असे जवानाला पत्र येतं. वर्षभर तो गावाकडे आलेला नसतो आणि तिथे सीमेवर तो आनंदात पेढे वाटतो. राजकारणही असंच आहे”, असे संतापजनक वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.

सीमेवरील जवानाच्या पत्नीच्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने परिचारक यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं. 2017 साली त्यांच्यावर हे निलंबन लावण्यात आले होते. मात्र, आता निवडणुकिच्या तोंडावर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर आज विधानपरिषदेत एकच गदारोळ माजला. त्यानंतर विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. आता 17 जूनला उर्वरीत अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे.

VIDEO : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *