ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये 'टार्गेट सिद्धिविनायक'चा मजकूर, विक्रोळीचा तरुण अटकेत

ठाण्यातील विवियाना मॉलमधील बाथरुममध्ये दहशतवादी मजकूर आढळल्याने खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे दुश्मन पर फतेह असा संदेश लिहून, मुंबईतील सिद्धीविनायक मंदीर उडवण्याचा उल्लेख आहे.

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये 'टार्गेट सिद्धिविनायक'चा  मजकूर, विक्रोळीचा तरुण अटकेत

ठाणे : ठाण्यातील विवियाना मॉलमधील बाथरुममध्ये दहशतवादी मजकूर आढळल्याने खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे दुश्मन पर फतेह असा संदेश लिहून, मुंबईतील सिद्धीविनायक मंदीर उडवण्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं आहे. दुष्मन पर फतेह, हिंदुस्थानपर फतेह, टार्गेट दादर सिद्धिविनायक..Boom असा मजकूर लिहिण्यात आला आहे. सिद्धिविनायक मंदीर उडवून देण्याची धमकी दिल्याने सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करुन, एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे.  हा तरुण विक्रोळीचा राहणारा आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने हा खोडसाळपणा केल्याचं समोर आलं आहे.  मुलीला त्रास देण्याचे हेतूने, त्याने दहशतवादी मजकूर लिहून, त्यासोबत तरुणीचा नंबर लिहिला होता.  या सर्व प्रकाराने मॉल प्रशासन आणि परिसरात भीतीचं वातावरण होतं. पोलिसांनी तातडीने याप्रकरणाचा तपास करुन छडा लावला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने हा प्रकार केल्याचं उघड झालं.

दरम्यान, यापूर्वी नवी मुंबईतील उरण पुलावरही दहशतवादी मजकूर लिहिल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी एका आरोपीला अटक करुन त्याची चौकशी सुरु आहे. त्यानंतर विवियाना मॉलमध्ये त्याप्रकारचा मजकूर आढळल्याने खळबळ उडाली. पण ठाण्यातील प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *