मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू, कारचा चेंदामेंदा

मुंबई-बंगळुरु महामार्गावर आज (7 जून) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू, कारचा चेंदामेंदा

मुंबई : मुंबई-बंगळुरु महामार्गावर आज (7 जून) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही कार मुंबईहून पुण्याकडे जात होती. पराग हेरगावकर, राजेंद्र मांजरे आणि अभिषेक शर्मा अशी अपघातात मृत झालेल्यांची नावं आहेत.

मुंबई-बंगळुरु महामार्गावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणारी स्विफ्ट कार (MH 12 EM 7944) भरधाव वेगाने जात होती. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला (GJ 31 T2614) स्विफ्ट कारने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातात कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

धडक एवढी जोरदार होती की तिघांचेही मृतदेह छिन्न विछीन्न अवस्थेत कारमध्ये आढळून आले. या अपघातात जखमी असलेल्या एकाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र धुके पसरलेले आहेत. अशामध्ये अपघात होण्याची शक्यता असते. आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघातात महामार्गावर झालेले आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांनीही गाड्या हळू चालवण्याचे आवाहन सर्वांना  केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *