आमदार निवासावर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न, विधानसभा अध्यक्षांपासून मंत्र्यांपर्यंत खैरे सरांची विनवणी

वेतन मिळत नसल्याने मुंबईत एका शिक्षकाकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. (Teacher Suicide attempt in Mumbai MLA house)

आमदार निवासावर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न, विधानसभा अध्यक्षांपासून मंत्र्यांपर्यंत खैरे सरांची विनवणी

मुंबई : मुंबईतील आमदार निवासावर चढून एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. वेतन मिळत नसल्याने आमदार निवासावरील चौथ्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. या घटनेनंतर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून त्या शिक्षकाला समजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Teacher Suicide attempt in Mumbai MLA house)

आमदार निवासावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणारे हे शिक्षक जालना जिल्ह्यातील असल्याचे बोललं जात आहे. गजानन खैरे असे या शिक्षकाचे आडनाव आहे. गेल्या एक तासापासून पोलीस आणि अमरावती विभाग स्थानिक शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे त्या शिक्षकाची समजूत काढत आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षक पगार मिळत नसल्याने हा शिक्षक आत्महत्येचा प्रयत्न करत आहे.

आपल्याला लेखी स्वरुपात सर्व पाहिजे आणि त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी पाहिजे, अशी मागणी शिक्षकाने केली आहे. नाना पटोले आणि उदय सामंत यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नाना पटोले यांनी खैरे यांच्याशी स्पीकरच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

“खैरे सर…. मी तुम्हाला मदत करतो. तुम्ही खाली उतरा. तुम्ही असं पाऊल उचलू नका. मी उद्याच त्यावर तोडगा काढतो,” असे नाना पटोले वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर त्या शिक्षकाने मी 15 वर्षांपासून शिकवतोय.
पगार मिळत नाही, असं या शिक्षकाने सांगितले आहे. या शिक्षकाच्या हातात ब्लेड असून तो गळ्याला लावून पुढे येऊ नका, असे बोलत आहे.

गजानन लक्ष्मण खैरे हा शिक्षक बदनापूरमधील ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये शिकत आहे. ते औरंगाबादपासून मुंबईला पायी चालत आल्याची माहिती आहे. मुंबईतील आमदार निवासस्थानावरुन 4 मजल्यावरुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाकडून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. (Teacher Suicide attempt in Mumbai MLA house)

संबंधित बातम्या : 

राज्यात पोलिसांची तब्बल साडेबारा हजार पदं भरणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *