अभिजित पानसेंसाठी मनसे पदाधिकाऱ्याकडून अख्खं थिएटर बूक

ठाणे : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमा रिलीज होण्यासाठी काही तास उरलेत. पण या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला जे मानापमान नाट्य झालं, त्याचा बदला घेण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्याने ठाण्यात संपूर्ण सिनेमागृहच बूक केलं आहे. स्पेशल स्क्रीनिंगला सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना बसायला जागा न मिळाल्याने ते नाराज झाले आणि निघून आले …

Movie Updates, अभिजित पानसेंसाठी मनसे पदाधिकाऱ्याकडून अख्खं थिएटर बूक

ठाणे : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमा रिलीज होण्यासाठी काही तास उरलेत. पण या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला जे मानापमान नाट्य झालं, त्याचा बदला घेण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्याने ठाण्यात संपूर्ण सिनेमागृहच बूक केलं आहे. स्पेशल स्क्रीनिंगला सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना बसायला जागा न मिळाल्याने ते नाराज झाले आणि निघून आले होते.

मुंबईत झालेल्या स्पेशल स्क्रीनिंगच्या वेळी घडलेल्या मानापमान नाट्याचे पडसाद ठाण्यात उमटले. अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना बसायला जागा न मिळाल्याने ठाण्यातील मनसेच्या संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यातील वंदना सिनेमाच्या बाहेर लावलेल्या चित्रपटाच्या फलकावरील खासदार संजय राऊत यांचे नाव खोडले. याशिवाय या अपमानाचा बदला घेण्यासाठी या सिनेमागृहातील सर्व तिकीट मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी विकत घेतल्या आहेत. वाचा‘ठाकरे’ वाद : काल पानसे अर्ध्यात निघून गेले, आज सेना-मनसे नेते जुंपले!

Movie Updates, अभिजित पानसेंसाठी मनसे पदाधिकाऱ्याकडून अख्खं थिएटर बूक

शुक्रवारी दुपारी साडेबाराला होणाऱ्या पहिल्या शोसाठी अभिजित पानसे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याची माहिती महेश कदम यांनी दिली. ठाकरे सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिजित पानसे यांनी पेलली आहे. पण त्यांच्याच कुटुंबीयांना सिनेमागृहात स्पेशल स्क्रीनिंगला जागा न मिळाल्याने मनसे कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. वाचा –  ‘ठाकरे’चं स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून गेलेल्या दिग्दर्शक पानसेंची पहिली प्रतिक्रिया

अभिजित पानसे स्क्रीनिंग सोडून माघारी

मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं होतं. पण स्वतः दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे कुजबुज पाहायला मिळाली. अभिजित पानसे यांना सर्वात पुढचं सीट दिल्यामुळे ते नाराज झाल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आलं नाही. पानसे कुटुंबासह घरी निघून गेले. अभिजित पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, तर संजय राऊत यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. वाचा‘ठाकरे’च्या स्क्रीनिंगवेळी अपमान, अभिजीत पानसेंच्या समर्थनार्थ मनसेचे तीन नेते मैदानात

Movie Updates, अभिजित पानसेंसाठी मनसे पदाधिकाऱ्याकडून अख्खं थिएटर बूक

खरं तर अभिजित पानसे हे दिग्दर्शक असण्यासोबतच मनसेचे नेतेही आहेत. मनसे आणि शिवसेनेचा छत्तीसचा आकडा आहे. पण सिनेमासाठी संजय राऊत यांनी अभिजित पानसेंसारख्या अनुभवी आणि कुशल दिग्दर्शकाची निवड केली होती. या सिनेमासाठी मनसेने अभिजित पानसेंना पोस्टरबाजी करत शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवर कुठेही संजय राऊत यांचं नाव किंवा फोटो नाही. वाचाअभिजीत, राजसाहेब बरोबर बोलले होते, हे तुला फसवणार : अविनाश जाधव

कोण आहेत अभिजित पानसे?

अभिजित पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये आलेला रेगे हा मराठी सिनेमा प्रचंड गाजला होता. रेगे हे अभिजित पानसे यांचं मोठं यश असल्याचं मानलं जातं. ठाकरे सिनेमासाठीही संजय राऊत यांनी अभिजित पानसे यांची निवड केली. वाचाठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या जवळचे नेते म्हणून ते परिचित आहेत. अगोदर शिवसेनेत असलेले अभिजित पानसे नंतर मनसेत आले होते. त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूकही लढली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *