शुभेच्छांसाठी धन्यवाद, आता दाढी करुन घ्या : संजय निरुपम

मुंबई : देशात 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपने मोठी मुसंडी मारत घटक पक्षांसह 353 चा आकडा गाठला आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही भाजप-शिवसेना युतीने बाजी मारलेली आहे. पण गम्मत म्हणजे मुंबईत माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांचा पराभव झाल्याने त्यांचा एक समर्थक नाराज झाला आहे. संजय निरुपम निवडून येण्यासाठी त्याने देवाकडे प्रार्थना …

congress ex mumbai president sanjay nirupam, शुभेच्छांसाठी धन्यवाद, आता दाढी करुन घ्या : संजय निरुपम

मुंबई : देशात 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपने मोठी मुसंडी मारत घटक पक्षांसह 353 चा आकडा गाठला आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही भाजप-शिवसेना युतीने बाजी मारलेली आहे. पण गम्मत म्हणजे मुंबईत माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांचा पराभव झाल्याने त्यांचा एक समर्थक नाराज झाला आहे. संजय निरुपम निवडून येण्यासाठी त्याने देवाकडे प्रार्थना केली होती की, निरुपम निवडून आल्यावरच दाढी करेल. पण निरुपम यांचा पराभव झाला.

संजय निरुपम यांचा पराभव झाल्याने त्यांच्या या समर्थकाने थेट सोशल मीडियावर निरुपम यांना टॅग करत आपली नाराजी व्यक्ती केली. यावर संजय निरुपम यांनी उत्तर देत म्हटलं की, “धन्यवाद, कृपया आता तुम्ही दाढी करुन घ्या.”

संजय निरुपम यांच्या या समर्थकाची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंकज मिश्रा असं या समर्थकाचे नाव आहे. त्याने या पोस्टमध्ये स्वत:चा दाढी असलेला फोटोही पोस्ट केला आहे. त्याच्या या पोस्टवर निरुपम यांनीही दाढी करण्याचा सल्ला दिला आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

“संजय निरुपमजी तुम्ही आमच्यासाठी आमच्या जवळच्या माणसांप्रमाणे आहात. आम्ही तुमच्या विजयासाठी रस्त्यावर उतरुन काम केले. यासोबतच तुम्ही विजयी व्हावे यासाठी देवाकडे साकडंही घातलं होतं की, तुम्ही निवडून आल्यावरच मी दाढी करेल. पण कदाचीत देवाने तुमच्यासाठी काही मोठा आशिवार्द राखून ठेवला असावा. यापुढेही मी संजय निरुपम यांच्यासाठी काम करत राहिल”, असं ट्वीट निरुपम यांचा समर्थक पंकज मिश्राने केली आहे.

दरम्यान, मुंबईमधील उत्तर-पश्चिम लोकसभा जागेवर शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांना 2 लाख 60 हजार 328 मतांना पराभूत केलं आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे गजानन किर्तीकर 5 लाख 70 हजार 63 मतांनी विजयी झाले आहेत. यामुळे काँग्रेसच्या संजयन निरुपम यांचा 3 लाख 9 हजार 735 मतांना पराभव झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *