राज ठाकरे यांचं घर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालं

मुंबई: मुंबईसह राज्यभरात ठाकरे सिनेमाची उत्सुकता आहे. शिवसैनिकांकडून ठाकरे सिनेमाचं जल्लोषी स्वागत करण्यात येत आहे. एकीकडे हे वातावरण असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी मात्र वेगळीच धामधूम सुरु आहे. राज ठाकरे यांचं कृष्णकुंज हे निवासस्थान विद्युत रोषणाईने झगमगून गेलं आहे. त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा शुभ विवाह दोन दिवसांवर …

राज ठाकरे यांचं घर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालं

मुंबई: मुंबईसह राज्यभरात ठाकरे सिनेमाची उत्सुकता आहे. शिवसैनिकांकडून ठाकरे सिनेमाचं जल्लोषी स्वागत करण्यात येत आहे. एकीकडे हे वातावरण असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी मात्र वेगळीच धामधूम सुरु आहे. राज ठाकरे यांचं कृष्णकुंज हे निवासस्थान विद्युत रोषणाईने झगमगून गेलं आहे. त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा शुभ विवाह दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या लग्नाची लगबग सध्या राज ठाकरेंच्या घरी सुरु आहे. अमित ठाकरे यांचं 27 जानेवारीला लग्न आहे.

त्यामुळं राज ठाकरे यांचं निवासस्थान कृष्णकुंजवर या विवाहाची जोरदार तयारी सुरु आहे. कृष्णकुंज निवासस्थान विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालं आहे. तर ‘कृष्णकुंज’च्या आसपासचे रस्तेही रंगबिरंगी विद्युत रोषणाईने झगमगून गेले आहेत.

27 जानेवारीला लग्न

अमित ठाकरेंचं लग्न 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईत होणार आहे. लोअर परळ इथल्या सेंट रेजिस इथं हा लग्नसोहळा पार पडेल. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत लगीनगाठ बांधणार आहे. राज ठाकरे यांनी अमितची लग्नपत्रिका नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवली. अमित ठाकरेंच्या लग्नपत्रिकेत 5 नावं आहेत. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला.

लग्नसोहळा मोठ्या प्रमाणात नाही

दरम्यान, लग्नसोहळा मोठ्या प्रमाणात नसेल, असं राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची यादी काढली तर लाखोंच्या घरात निमंत्रण द्यावं लागले. तुमच्या हौसेसाठी म्हणून त्या नवदाम्पत्याची ससेहोलपट करायची हे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे लग्नसोहळा मोठ्या प्रमाणात नसेल, असं राज ठाकरे म्हणाले होते.

संबंधित बातम्या 

भावाच्या लग्नाला जावंच लागणार, अमितच्या लग्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर   

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर  

अमितच्या लग्नपत्रिकेत 5 नावं, लग्नासाठी किती जणांना निमंत्रण? 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *