केमिकलचे 414 ड्रम शेतात पुरले, मुंबईजवळील घटना

अंबरनाथ(ठाणे) : अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील शेतात केमिकलचे 414 ड्रम पुरण्यात आले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी घटनास्थळी धाव घेत, सर्व केमिकलचे ड्रम आणि जेसीबी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस आणि एमपीसीबीकडून कुणावरही कारवाई केलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यातील करवले गावात मुंबई महापालिकेचे डपिंग होणार असल्याच्या …

, केमिकलचे 414 ड्रम शेतात पुरले, मुंबईजवळील घटना

अंबरनाथ(ठाणे) : अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील शेतात केमिकलचे 414 ड्रम पुरण्यात आले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी घटनास्थळी धाव घेत, सर्व केमिकलचे ड्रम आणि जेसीबी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस आणि एमपीसीबीकडून कुणावरही कारवाई केलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यातील करवले गावात मुंबई महापालिकेचे डपिंग होणार असल्याच्या मुद्यावरून चर्चेत आहे. त्याच करवले गावातील काही शेतामध्ये 22 नोव्हेंबर रोजी जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदत खड्ड्यात केमिकलचे ड्रम पुरण्यात आले होते. ही माहिती हिललाईन पोलिसांना मिळताच पोलिसांनी धडक कारवाई केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ही घटनास्थळी उपस्थित होते. घटनास्थळी हे केमिकलचे ड्रम दोन शेतात पुरण्यात आले होते. पहिल्या शेतातून 100 तर दुसऱ्या शेतात तब्बल 314 केमिकलचे ड्रम पुरण्यात आले होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात केमिकलचे ड्रम शेतात पुरण्यात येत असल्याने या भागात केमिकल कंपन्या आणि केमिकलची विल्हेवाट लावणारी मोठी टोळी सक्रीय असल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे यांनी वर्तवली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *