मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तुफान प्रतिसाद; 21 हजार वैद्यकीय योद्धे कोरोना लढाईसाठी रणांगणात

कोरोना युद्धात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला आहे (Registration for COVID Yoddha to fight against Corona).

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तुफान प्रतिसाद; 21 हजार वैद्यकीय योद्धे कोरोना लढाईसाठी रणांगणात

मुंबई : कोरोना युद्धात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला आहे (Registration for COVID Yoddha to fight against Corona). आरोग्य क्षेत्राशी सबंधित 21 हजार जणांनी कोरोना नियंत्रणाच्या कामात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी रितसर अर्ज केले असून आता या अर्जांची छाननी होत आहे. यानंतर या व्यक्तींना त्या त्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या या लढ्यात शासनाला प्रत्यक्ष सहभागी होऊन मदत करावी असं आवाहन केलं. यानंतर डॉक्टर्स, आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतू ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळालं नाही असे इच्छुक अशा अनेकांनी पुढे येऊन आपले नाव, पत्ता covidyoddha@gmail.com या ई मेलवर नोंदवावे असं आवाहन करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर अवघ्या 5 दिवसांत 21 हजार जणांनी विविध अर्ज करुन तशी इच्छा व्यक्त केली. यामध्ये 943 डॉक्टर्स, 3312 परिचारिका, 1141 फार्मसिस्ट, 863 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 766 वार्ड बॉय, 614 पॅरा वैद्यकीय, 569 इतर वैद्यकीय, 76 सैन्यातील निवृत्त जवान यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त इतर व्यक्तींमध्ये समाज सेवक, वैद्यकीय स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अर्ज करण्यात आलेले देखील अनेकजण आहेत. या सर्वांसाठी एक गुगल फॉर्म देण्यात आला आहे. त्यातून सुमारे 18 हजार व्यक्तींनी हे फॉर्म भरुन दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज जगभर टंचाई आहे पण  वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वाढविण्याचा आमचा  प्रयत्न  सुरु आहे. अनेक व्यक्ती, संस्था आपल्याला मदत करताहेत. कुणी पीपीई कीट देताहेत, कुणी व्हेटीलेटर देताहेत. वैद्यकीय क्षेत्रातील २१ हजार लोकांनी आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे असेही ते म्हणाले.  आता तर या युद्धात सर्व नामवंत डॉक्टर्स आमच्या बरोबर सहभागी झाले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टर्सचा टास्क फोर्स राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करणार आहे.”

आता या व्यक्तींना आवश्यकतेनुसार विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येईल. सबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे या वैद्यकीय स्वयंसेवकांना जबाबदारी देतील.

संबंधित बातम्या :

मला राजचीही साथ, उद्धव ठाकरेंकडून एकजुटीचा उल्लेख

प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी व्हॅक्सिनचे प्रयोग, यश आल्यास महाराष्ट्र जगाला दिशा देईल : मुख्यमंत्री

Extended Lockdown : वांद्र्यातील गर्दी ते आगीचे बंब, टास्क फोर्स ते तज्ज्ञ समिती, मुख्यमंत्र्यांचे 10 महत्त्वाचे मुद्दे

Registration for COVID Yoddha to fight against Corona

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *