आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. हा मेगाब्लॉक फक्त मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर घेण्यात आला आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक नाही. त्यामुळे आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते दुपारी 3.50 हा ब्लॉक घेतला जाणार आहे मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा …

आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. हा मेगाब्लॉक फक्त मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर घेण्यात आला आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक नाही. त्यामुळे आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते दुपारी 3.50 हा ब्लॉक घेतला जाणार आहे

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबतील. माटुंगानंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.

आज घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. मात्र हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना आज मेगाब्लॉकचा त्रास होणार नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *