LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

भररस्त्या साडे बारा लाख रुपयांची लुट

दिवसा ढवळ्या कल्याणमध्ये साडे बारा लाख रुपयांची लुट झाली आहे. कल्याण पश्चिमेकडील पोर्णिमा चौक परिसरात ही घटना घडली. बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असलेल्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लुटलं आहे. मारहाण करत साडे बारा लाखांची रोकड असेलली बॅग हिसकावून चौरटे पसार झाले आहेत.

31/05/2019,12:17PM
Picture

भरदिवसा बँकेतून 62 हजार रुपये लंपास

कोल्हापुरात पिस्तुलीचा धाक दाखवून भरदिवसा बँकेतील रोकड लंपास केली आहे. यशवंत बँकेची 62 हजाराची रोकड चोरट्यांनी पळवली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

31/05/2019,12:13PM
Picture

नागपुरातील संदेश दवा बाजारात भीषण आग

नागपूर येथील संदेश दवा बाजारात मध्यरात्री भीषण आग, आगीत 30 ते 40 दुकानांचं नुकसान, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सरु

31/05/2019,9:16AM
Picture

विदर्भ आणि मराठावाड्यात उष्णतेची लाट

विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरीक हैराण झाले आहेत. तीन दिवस ही उष्णतेची लाट राहणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बऱ्याच ठिकाणांचे तापमान हे 46 अंशावर गेले आहे. लोकांनी घरा बाहेर पडू नये, असं आवाहन हवामान विभागाने केले आहे.

31/05/2019,8:44AM
Picture

गो एयर' कंपनीच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

नागपूर : ‘गो एयर’ कंपनीच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, मंथन महेंद्र चव्हाण असे कर्मचाऱ्याचे नाव, अजनीतील चंद्रमणीनगर भागात घटना, कंपनीतील अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून मंथन यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबीयांचा आरोप

31/05/2019,7:56AM
Picture

मोदींच्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

शपथविधीनंतर आज कॅबिनेटची पहिली बैठक आहे. आज सकाळी 11 वाजता केंद्रीय कॅबिनेटची पहिली बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर मोदींचे मंत्रिमंडळ कामाला सुरुवात करणार आहेत.

31/05/2019,7:37AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *