मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (12 मे) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक असेल. आज पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते माहिम रेल्वे स्टेशन दरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्टेशन दरम्यानही ब्लॉक घेण्यात आला असून हार्बर मार्गावर …

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (12 मे) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक असेल. आज पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते माहिम रेल्वे स्टेशन दरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्टेशन दरम्यानही ब्लॉक घेण्यात आला असून हार्बर मार्गावर आज कोणताही ब्लॉक घेण्यात आला नाही. ब्लॉक दरम्यान सर्व लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. ओव्हरहेड वायर आणि सिग्नलसह इतर अन्य इतर कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय. यामुळे धिम्या मार्गावरील लोकल या जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान डाऊन लोकल जलद मार्गावर वळवल्या जातील. यासोबतच कळवा, मुंब्रा आणि ठाणे स्टेशनवर लोकल थांबणार नाही.

ठाणे ते दिवा दरम्यानही अप धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत असेल.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.35 ते 3.35 दरम्यान हा ब्लॉक आहे. ब्लॉक दरम्यान सर्व लोकल अप डाऊन मार्गावर वळवल्या जातील. महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड या स्थानकावर एकही लोकल थांबणार नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *