तुकाराम मुंढे मुनगंटीवारांनाही नकोसे, एका महिन्यात दुसरी बदली

मुंबई : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. 21 नोव्हेंबर रोजी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. नियोजन विभाग हा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे येतो. सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोसे झाल्याचं बोललं जात होतं. अखेर मुंढेंना दुसरीकडे साईड पोस्टिंग देण्यात आली …

तुकाराम मुंढे मुनगंटीवारांनाही नकोसे, एका महिन्यात दुसरी बदली

मुंबई : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. 21 नोव्हेंबर रोजी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. नियोजन विभाग हा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे येतो. सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोसे झाल्याचं बोललं जात होतं. अखेर मुंढेंना दुसरीकडे साईड पोस्टिंग देण्यात आली आहे.

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

तुकाराम मुंढे – एड्स नियंत्रण सोसायटी, प्रकल्प संचालक, मुंबई

साई बाबा संस्थानच्या सीईओ रुबल प्रखेर अग्रवाल – अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले – अध्यक्ष, NRMDA, नागपूर

बालाजी मंजुळे – दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे

तुकाराम मुंढे यांची कारकीर्द

नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं. वाचातुकाराम मुंढेंचे ‘हे’ आठ निर्णय रद्द, मनमानीमुळे पीएमपी तोट्यात

सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं. वाचातुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, चूक एकच – ‘नियमाने काम’

नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. वाचाभल्याभल्यांना धडकी भरवणारे तुकाराम मुंढे पहिल्यांदाच इमोशनल

नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली. वाचामाझं काम सुरुच राहिल, हसतमुखाने तुकाराम मुंढेंचा नाशिककरांना निरोप

पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली. नागरिक तुकाराम मुंढेंच्या कामाचं नेहमीच कौतुक करतात आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. पण राजकारण्यांना त्यांचं एवढं वावडं का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *