Navi Mumbai | कोरोनामुक्तीचा 'तुर्भे पॅटर्न' संपूर्ण नवी मुंबईमध्ये, पालिका आयुक्त स्वतः मैदानात

कोरोना नियंत्रित भागात पुन्हा फैलाव होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी तुर्भे स्टोअर्स झोपडपट्टीला भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेतला

Navi Mumbai | कोरोनामुक्तीचा 'तुर्भे पॅटर्न' संपूर्ण नवी मुंबईमध्ये, पालिका आयुक्त स्वतः मैदानात

नवी मुंबई : कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळख निर्माण केलेल्या ‘तुर्भे स्टोअर्स झोपडपट्टी’त आता कोरोना हद्दपार झाला आहे. गेल्या दहा दिवसात या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे कोरोनामुक्तीचा हा तुर्भे पॅटर्न संपूर्ण नवी मुंबईमध्ये राबवण्यात येणार असून यासाठी महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ हे स्वतः फिल्डवर उतरले आहेत. (Turbhe Pattern to stop Corona Spread to be Implemented in Navi Mumbai)

तुर्भे स्टोअर्स झोपडपट्टीची लोकसंख्या ही सुमारे एक लाखाच्या आसपास आहे. 23 एप्रिल रोजी या झोपडपट्टी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. दाटीवाटीने घरे असल्यामुळे कोरोनाचा फैलाव या झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात झाला. मात्र या भागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास गायकवाड आणि त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेतले. माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांची मोठी फौज तयार झाली. स्वयंसेवक आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी खांद्याला खांदा लावून काम केले. त्यामुळे तुर्भे स्टोअर्सने कोरोनावर मात केली.

कोरोना नियंत्रित आलेल्या या भागात पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी आज तुर्भे स्टोअर्स झोपडपट्टीला भेट देऊन महापालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना करुन कोरोनामुक्तीचा हा तुर्भे पॅटर्न संपूर्ण शहरामध्ये राबवण्याचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त अमोल यादव, दादासाहेब चाबुकस्वार, विभाग अधिकारी समीर जाधव आदी उपस्थित होते.

घरोघरी जाऊन होणार मास स्क्रीनिंग

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नवी मुंबई शहरातील 44 कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. या सर्वच भागात स्वयंसेवक आणि महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन मास स्क्रीनिंग करणार आहेत. तुर्भे स्टोअर्समध्ये 22 टीम तयार करण्यात आल्या असून एका टीम मध्ये 27 जणांचा समावेश आहे. प्रत्येक टीम 9 पथकांमध्ये काम करत आहे. त्यांच्याकडे थर्मल गन आणि ऑक्सिमीटर देण्यात आले आहे, असेही महापालिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

(Turbhe Pattern to stop Corona Spread to be Implemented in Navi Mumbai)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *