LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

अकोल्यात ट्रक-मोटारसायकलच्या अपघातात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू

अकोला-नादेंड महामार्गावर मथुरा ढाब्याजवळ ट्रॅकने मोटारसायकलला उडविले. या भीषण अपघातात एका महिलेसह 10 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. शोभा कड (55) आणि तनुजा कड (10) असं मृतांचे नाव आहे. या दोघीही सावरगाव बर्डे येथील रहिवाशी आहेत.

30/05/2019,2:03PM
Picture

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण क्राईम ब्रँचकडे

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबई पोलीस या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत होते. काल झालेल्या सुनावणीत ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला होता. यामुळे हे प्रकरण आता क्राईम ब्रँचकडे सोपवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

30/05/2019,1:35PM
Picture

मोदींच्या शपथविधी दरम्यान पुण्यात मोफत चाय वाटप

पुण्यात नरेंद्र मोदींची प्रेरणा घेऊन सदाशिव पेठेत सुरु झालेल्या ‘नमो अमृततुल्य’ तर्फे मोफत चहा वाटण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी 4 ते 7 यावेळेत मोफत चहा देण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी निमित्त कसबा मतदारसंघाच्यावतीने सत्यनारायणम महापूजा व जल्लोष करण्यात येणार आहे.

30/05/2019,1:10PM
Picture

माणिकराव ठाकरेंची राज ठाकरेंना भेट

माणिकराव ठाकरेंनी राज ठाकरेंची आज भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान राजकीय चर्चा झाले नसल्याचे माणिकराव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच राज ठाकरे यांचे मोदी-शाहाव विरोधी भूमिकेबाबत एक विचार असल्याने ही भेट घेण्यात आली. राज ठाकरे यांना सोबत घ्यायचे का नाही हे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतली, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.

30/05/2019,12:42PM
Picture

पुण्यात वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची बैठक

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आघाडीसोबत जायचे की स्वबळावर लढायचे याचा निर्णय होणार आहे.

30/05/2019,12:37PM
Picture

नागपूरमध्ये दगडाने ठेचून युवकाची हत्या

नागपूरमध्ये गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही घटना काटोल नाका येथे घडली. अकिंत तिवारी असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणात दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

30/05/2019,9:11AM
Picture

भीवंडीत महानगरपालिकेच्या गाडीखाली चिरडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू

भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात रात्री महानगरपालिकेच्या घंटागाडीने 6 वर्षीय चिमुरड्याला चिरडले. रोहित विजय लोंढे असं मयत मुलाचे नाव आहे. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिकांनी घंटागाडी चालकाला मारहाण केली आहे. शांतीनगर पोलिसांनी या घटनेची नोंद घेत पुढील कारवाई केली आहे.

30/05/2019,9:00AM
Picture

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली

30/05/2019,7:58AM
Picture

मोदी सरकारचा आज शपथविधी सोहळा

मोदी सरकारचा आज शपथविधी सोहळा आहे. राष्ट्रपती भवनात हा सोहळ पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 8 हजार लोक येणार आहेत. सोहळ्यासाठी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

30/05/2019,7:52AM
Picture

नरेंद्र मोदींची महात्मा गांधींना आदरांजली

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.

30/05/2019,7:21AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *