Payal Tadvi suicide case : तीन आरोपी डॉक्टरांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी, आतापर्यंत काय काय झालं?

मुंबई : रॅगिंगमुळे आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी नायर रुग्णालयातील तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहर,  डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिन्ही आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान या तिन्ही आरोपी डॉक्टरांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी काल (28 मे) संध्याकाळी […]

Payal Tadvi suicide case : तीन आरोपी डॉक्टरांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी, आतापर्यंत काय काय झालं?
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 3:39 PM

मुंबई : रॅगिंगमुळे आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी नायर रुग्णालयातील तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहर,  डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिन्ही आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान या तिन्ही आरोपी डॉक्टरांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी काल (28 मे) संध्याकाळी आरोपी डॉ. भक्ती मेहरला अटक केली होती. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी डॉ. हेमा आहुजा हिच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यानंतर नुकतंच या प्रकरणी तिसऱ्या आरोपी डॉ. अंकिता खंडेलवाल अटक करण्यात आली होती.

रॅगिंगमुळे आत्महत्या

मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीने 22 मे रोजी आत्महत्या केली. पायल तडवी असं या विद्यार्थीनीचे नाव आहे. पायलवर वरिष्ठ डॉक्टर सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून पायलने गळफास घेत आत्महत्या केली. पायलला सतत ती आदिवासी असल्याने हिणवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पायल मूळची जळगावची रहिवासी होती. आदिवासी समाजातील पायल ताडवी एका गरीब घरातून वैद्कीय शिक्षणासाठी मुंबईत आली होती. नुकतेच तिचे लग्नही झाले होते. पण ही सर्व स्वप्न आता एका क्षणात उद्धवस्त झाली आहेत. कारण पायलने नायर रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केली.

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येपूर्वीचं व्हॉट्सअॅप चॅट ‘टीव्ही 9’ च्या हाती

आदिवासी असणं हा पायलसाठी अभिशाप ठरला. कारण तिला राखीव कोट्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. यामुळे नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरकडून तिचा वारंवार मानसिक छळ केला जात होता. कँटीनमध्ये तिच्यावर कमेंट करणं, व्हाट्सअॅप ग्रुपवर तिला वाईट वाटेल, असे मेसेज करणे, असा प्रकार तीन महिला सिनिअर डॉक्टर्सकडून करण्यात येत होता. या सगळ्याला कंटाळून पायलने नायर वैदयकीय महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

रॅगिंग करणाऱ्या महिला डॉक्टर पसार

आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टरांविरुद्ध अॅट्रोसिटीबरोबर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक

नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या रॅगिंगच्या जाचाला कंटाळून  पायल तडवी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिवारी नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक घेण्यात आली. ती बैठक आठ तास चालली. चौकशीनंतर प्रसुती विभागातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल तिन्ही डॉक्टर फरार असल्याने त्यांचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. त्यांच्यावर रॅगिंगचा आरोप आहे.

संबंधित अहवाल काल सोमवारी (27 मे) जाहीर करण्यात येणार आसल्याची माहिती मार्डकडून देण्यात आली. बैठकीमध्ये रुग्णालयातील विद्यार्थी डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचारी, परिचारिका तसेच विभागप्रमुखांसह समितीमधील विद्यार्थी डॉक्टर प्रतिनिधींचा समावेश होता. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. हा अहवाल सोमवारी वैद्यकीय संचालनालय, एमसीआय, एमयूएचएस यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मार्डकडून देण्यात आली. डॉक्टरांसाठी हेल्पलाइन क्रमांक, समुपदेशन कक्ष सुरू करण्याचे विचाराधीन आहे.

महिला आयोगाकडून दखल

रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महतेच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे गंभीर दखल घेतली. महिला आयोगाने मुंबईतील नायर रूग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावली.कारवाई करण्याबरोबरच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे.

विद्यार्थ्यांचा मोर्चा

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी शनिवारी भारतीय विद्यार्थी मोर्चा तसेच राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती या संघटनांद्वारे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. एन. भारमळ यांस निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित तीन आरोपींवर कडक कारवाई करून त्यांचे अडमिशन रद्द करावे आणि त्यांची MBBS डिग्रीचा परवाना रद्द करावी अशी मागणी केली.

त्याचबरोबर स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ.शिरोडकर आणि डॉ. चिंगलिंग यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

जळगावात निवेदने 

अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तीन महिला डॉक्टरांवर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई व्हावी, तसेच रुग्णालयाच्या प्रबंधन समितीवर कारवाई व्हावी, असे निवेदन आज विविध आदिवासी संघटनांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

तिन्ही डॉक्टरांना अटक

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल या  तिघींना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आज या तिघींना कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी काल (28 मे) संध्याकाळी आरोपी डॉ. भक्ती मेहरला अटक केली होती. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोघींना पोलिसांना अटक केली आहे.

आरोपी डॉक्टरांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान या प्रकरणी या तिन्ही डॉक्टर आरोपींना आज 29 मे रोजी सत्र न्यायलयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायलयात पायलच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण असल्याचा धक्कादायक खुलासा कुटुंबीयांनी केला होता. यामुळे पायलच्या मृतदेहाचं पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्याची मागणी वकील नितीन सातपुतेनी केली आहे.

पायल तडवी आत्महत्या – आतापर्यंत काय काय झालं?

22 मे – रॅगिंगमुळे डॉ. पायल तडवीची आत्महत्या 22 मे – रॅगिंग करणाऱ्या महिला डॉक्टर पसार – डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महीरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल 25 मे – नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक 25 मे – विद्यार्थ्यांचं आंदोलन, दोषींना शिक्षेची मागणी 26 – पायलचं व्हॉट्सअप चॅट समोर 27 मे – महिला आयोगाकडून दखल 27 मे – आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन डॉक्टरांचे निलंबन, मार्डची कारवाई 27 मे – पायलच्या मूळगावी जळगावात निवेदने 28 मे – पायलच्या कुटुंबीयांचं नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन 28 मे – वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन कुटुंबीयांच्या भेटीला 28 मे – तीनपैकी एका डॉक्टरला अटक, डॉ. भक्ती मेहरला पोलिसांकडून अटक 28 मे – प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल 29 मे – आणखी दोन डॉक्टरांना पोलिसांकडून अटक 29 मे – डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोघींना मध्यरात्री अटक 29 मे – तिघींना कोर्टात हजर केलं  जाणार 29 मे- सकाळी तिन्ही आरोपी सत्र न्यायलयात हजर 29 मे – पायलच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप 29 मे – पायलच्या मृतदेहाचं पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्याची वकील नितीन सातपुतेंची मागणी 29 मे – पायलच्या आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी

संबंधित बातम्या :

Payal Tadvi suicide case : पायलच्या आठवणीने तडवी कुटुंबाने हंबरडा फोडला

डॉ. पायल तडवी आत्महत्या : आतापर्यंत काय काय झालं?

रॅगिंगला कंटाळून डॉक्टर तरुणीची नायर रुग्णालयात आत्महत्या   

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येपूर्वीचं व्हॉट्सअॅप चॅट टीव्ही 9 च्या हाती   

Payal Tadvi suicide case : कुटुंबीय म्हणाले ही तर हत्या, महाजन म्हणाले दोषींना सोडणार नाही!

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.