'बेस्ट'च्या खासगीकरणाचा विचार नाही, झालं तरी मालकी हक्क देणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघत नाही, दुसरीकडे बेस्ट बस ठप्प असल्याने मुबईकरांचेही हाल होताना दिसत आहेत. अशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट संपावर अखेर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बेस्टची तिजोरी रिकामी झालेलीच आहे, त्यात अवाजवी मागण्या केल्या, तर अजून समस्या निर्माण होतील, अशी भूमिका …

'बेस्ट'च्या खासगीकरणाचा विचार नाही, झालं तरी मालकी हक्क देणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघत नाही, दुसरीकडे बेस्ट बस ठप्प असल्याने मुबईकरांचेही हाल होताना दिसत आहेत. अशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट संपावर अखेर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बेस्टची तिजोरी रिकामी झालेलीच आहे, त्यात अवाजवी मागण्या केल्या, तर अजून समस्या निर्माण होतील, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

‘बेस्ट’च्या खासगीकरणाबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“बेस्टचं खासगीकरण हा अंतिम पर्याय नाही. खासगीकरण जरी करायचा विचार समोर आला, तरीही मालकी हक्क आम्ही जाऊ देणार नाही. संपूर्ण खासगीकरण होऊ देणार नाही, झालं तरी फक्त काही बस गाड्यांचा असू शकेल. मात्र यावर अद्याप निर्णय नाहीय.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“बेस्ट संपाबाबत एकमेकांवर आरोप करु काही होणार नाही. आधी मान्यताप्राप्त युनियन आणि प्रशानाने करार केले होते, त्यानुसार वेतन मिळतंय. आम्ही सर्वांनी चर्चा केली. मात्र काही तोडगा निघाला नाही. बेस्टची आर्थिक स्थिती खराब आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणले. तसेच, बेस्टच्या बजेटचं विलीनीकरण करण्याचं आश्वासन मी दिलं होतं, ते पूर्ण करु, असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.

एकत्रित बसून चर्चा केली, तर मार्ग निघेल. संपाचा निर्णय आता कोर्टाकडे आहे. तरीही माझी गरज असेल, तर चर्चेला तयार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत, त्या करायला हव्यात. बेस्टच्या संपात राजकारण आणण्याची माझी इच्छा नाही. बेस्टची तिजोरी रिकामी झालेलीच आहे, त्यात अवाजवी मागण्या केल्या, तर अजून समस्या निर्माण होतील.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बेस्ट संपाचा इतिहास, आतापर्यंतचा सर्वात मोठा संप

 • 1997 मध्ये 4 दिवसाचा संप झाला होता, कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्त्वात  हा संप झाला होता.
 • 2007 मध्ये-  महाव्यवस्थापक खोब्रागडे असताना एक संप झाला होता , 3 दिवसाचा संप होता, पण यावेळी महाव्यवस्थापकांनी काही कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून नवीन कामगार भरती केली होती, यावेळी कामगार नेते शरद राव अध्यक्ष होते
 • 2011 मध्ये – यावर्षी सुद्धा 3 दिवसाचा संप झाला होता.
 • 2017- मध्ये कामगार नेते शरद राव यांच्यानंतर शशांकराव यांनी धुरा घेतली. यावेळी 1 दिवसाचा संप झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं होतं.
 • 2019- यंदा सहावा दिवस संप सुरु आहे

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 

 • ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.
 • 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.
  एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
 • 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
 • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
 • अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *