अमित शाहांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गुजरातला जाणार

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुजरातमध्ये जाणार आहेत. अमित शाह उद्या गांधीनगरमधून अर्ज भरणार आहेत. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी शिवसेना-भाजपमधील एकजूट दाखवण्याचाही प्रयत्न होणार आहे. गुजरातमधील गांधीनगर येथून …

अमित शाहांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गुजरातला जाणार

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुजरातमध्ये जाणार आहेत. अमित शाह उद्या गांधीनगरमधून अर्ज भरणार आहेत. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी शिवसेना-भाजपमधील एकजूट दाखवण्याचाही प्रयत्न होणार आहे.

गुजरातमधील गांधीनगर येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत गुजरातमधील एका जागेवरील उमेदवाराची घोषणा झाली होती, ते म्हणजे स्वत: अमित शाह यांची. गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी लढत असत. मात्र, यावेळी त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. शिवाय, त्यांच्या मतदारसंघातून म्हणजे गांधीनगरमधून स्वत: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह लढणार आहेत.

अमित शाह हे उद्या (30 मार्च) गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना काल रात्री फोन करुन निमंत्रण दिले. अमित शाह यांचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे अमित शाह यांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: गांधीनगर येथे उपस्थिती राहणार आहेत.

सत्तेत राहून भाजपविरोधी टीका केल्यानंतर अखेर शिवसेना-भाजपने युती केली आणि शिवसेनेचे ताठ बाण्याचा स्वबळाचा नारा हवेतच विरला. शिवाय, अमित शाह यांनीही शिवसेनेले ‘पटक देंगे’ असे म्हटले होते. हे सगळं विसरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपशी पुन्हा हातमिळवणी केली आणि लोकसभा निवडणुकांना एकत्र सामोरं जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, गुजरातमध्ये अमित शाह यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहून, उद्धव ठाकरे हे शिवसेना-भाजप युतीतली एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *