ना कचऱ्याचे ढिग, ना दुर्गंधी, मुंबईत आता अंडरग्राउंड कचरा संकलन

मुंबई: मुंबईतील कचऱ्याच्या प्रश्नावर महापालिका अनेक उपाययोजना करत असते. वेगवेगळे प्रकल्प राबवत असते. सार्वजनिक ठिकाणी अनेक कचरा संकलन केंद्र उभारलं जातं. पण कचराप्रश्न सुटत नाही. त्यावर महापालिकेने आता दुसरा पर्याय शोधला आहे. महापालिकेने अंडरग्राऊंड कचरा संकलन केंद्र उभारलं आहे. गिरगाव चौपाटी आणि शहीद भगत सिंह मार्गाशेजारी दोन अंडर ग्राउंड कचरा संकलन केंद्र उभारलं आहे. अंडरग्राऊंड …

ना कचऱ्याचे ढिग, ना दुर्गंधी, मुंबईत आता अंडरग्राउंड कचरा संकलन

मुंबई: मुंबईतील कचऱ्याच्या प्रश्नावर महापालिका अनेक उपाययोजना करत असते. वेगवेगळे प्रकल्प राबवत असते. सार्वजनिक ठिकाणी अनेक कचरा संकलन केंद्र उभारलं जातं. पण कचराप्रश्न सुटत नाही. त्यावर महापालिकेने आता दुसरा पर्याय शोधला आहे. महापालिकेने अंडरग्राऊंड कचरा संकलन केंद्र उभारलं आहे. गिरगाव चौपाटी आणि शहीद भगत सिंह मार्गाशेजारी दोन अंडर ग्राउंड कचरा संकलन केंद्र उभारलं आहे.

अंडरग्राऊंड संकलन केंद्र तयार केले असून, वर दोन बॉक्स बसवले आहेत. यात कचरा टाकला की हा कचरा अंडर ग्राउंड संकलन केंद्रात जाऊन पडतो. आधी मोकळे डब्बे हे कचरा जमा करण्यासाठी वापरले जात होते, त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत असे. पण आता अंडर ग्राऊंड संकलन असल्याने दुर्गंधी पसरणार नाही.

सध्या प्रयोगिक तत्वावर दोन ठिकाणी अंडरग्राऊंड कचरा संकलन बीन बसवण्यात आले आहेत. पुढील काळात मुंबईत सर्वच ठिकाणी अंडरग्राऊंड कचरा संकल बीन बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना आपल्याला कचऱ्याचे ढिग किंवा दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *