ठाकरे-अंबानी कुटुंब: भावांचे वाद आणि चक्रावून टाकणारे योगायोग

मुंबई: भाऊ…एक असं नातं ज्यात वडिलांचा विश्वास आणि आईची माया या दोघांचं मिश्रण असतं. आपल्या पाठिशी भाऊ असेल तर आईवडिलांची उणीव भासत नाही. आणि यामुळेच भावाला वडिलांचा तर वहिनीला आईचा मान दिला जातो. मात्र बऱ्याचदा अशी वेळ येते की या नात्यांमध्ये अंतर पडतं. त्यावेळी मग महाभारतही घडू शकतं. मात्र त्यातूनही बाहेर पडत काही नाती अशी […]

ठाकरे-अंबानी कुटुंब: भावांचे वाद आणि चक्रावून टाकणारे योगायोग
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई: भाऊ…एक असं नातं ज्यात वडिलांचा विश्वास आणि आईची माया या दोघांचं मिश्रण असतं. आपल्या पाठिशी भाऊ असेल तर आईवडिलांची उणीव भासत नाही. आणि यामुळेच भावाला वडिलांचा तर वहिनीला आईचा मान दिला जातो. मात्र बऱ्याचदा अशी वेळ येते की या नात्यांमध्ये अंतर पडतं. त्यावेळी मग महाभारतही घडू शकतं. मात्र त्यातूनही बाहेर पडत काही नाती अशी असतात जी आपलं मूळ रुप पुन्हा मिळवतात. अशाच काहीशा चढउतार असलेल्या या दोन कहाण्या. एक कहाणी आहे ठाकरे बंधूंची आणि दुसरी कहाणी अंबानी बंधूंची.

एक शहर… एकच नातं…कहाणीही साधारण एकसारखीच..पण परिस्थिती वेगळी-वेगळी

एकीकडे मायानगरीत कुबेरपुत्र म्हणून ओळखले जाणारे अंबानी बंधू. तर दुसरीकडे राज्याच्या राजधानीत जम बसवलेले ठाकरे बंधू.. जसा अंबानी बंधूंच्या व्यवसायांचा पाया धीरुभाई अंबानींनी रचला, त्याचप्रमाणे ठाकरे बंधूंच्या राजकारणाचा पाया बाळासाहेब ठाकरेंनी उभारला. दोन्ही कहाण्यांमध्ये फरक फक्त त्यांच्या पार्श्वभूमीचा आणि नात्याचा आहे.

एक नातं सख्खं….तर एक चुलत…मात्र दोन्ही कुटुंबातील नात्यांमधील संस्कार आणि ऊब आजही देशातल्या प्रत्येक घरासारखीच आहे. एक मराठमोळा परिवार तर दुसरा पारंपरिक गुजराती परिवार.

अंबानी बंधूंनी खांद्याला खांदा लावत रिलायन्सचा जम बसवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तिथे ठाकरे बंधूंनीही शिवसेनेला वर आणण्यात आपलं रक्त आटवलं.

मात्र योगायोग असा की महाभारताप्रमाणे या दोन्ही कुटुंबात जवळजवळ एकाच वेळी वावटळं आली आणि दोन्ही भाऊ वेगळे झाले. त्यांच्यात वाटण्या झाल्या.

2005 मध्ये मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात पिता धीरुभाई यांच्या मालमत्तेची वाटणी झाली. दुसरीकडे त्याच वर्षी राज आणि उद्धव यांच्यातील दरीही वाढत गेली. 2006 मध्ये त्यांच्यात राजकीय वाटणी झाली.

अंबानी घराण्यात एकाला रिलायन्स इंडस्ट्रीज मिळाली तर छोट्या भावानं अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप बनवला. तिकडे शिवसेना उद्धवकडे राहिली तर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्मिती केली. चारही भाऊ चार दिशेला गेले. त्यांच्या नात्यात कटूता आली. जे भाऊ एकमेकांची ताकद होते, तेच आता एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. एखाद्या बॉलिवूडच्या सिनेमाप्रमाणे यांचं प्रेम क्षणात द्वेषात बदलून गेलं. एकमेकांकडे जाणं तर सोडाच, एखाद्या ठिकाणी एकत्र येणंही ते टाळू लागले.

जेव्हा वाटण्या झाल्या तेव्हा दोन्ही घराण्यातील चारही भाऊ आपापल्या जागी भक्कम होते. मुकेश अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि उद्धव ठाकरेंकडे शिवसेना तर होतीच. पण या दोघांपेक्षाही लोकांच्या जास्त अपेक्षा होत्या, त्या अनिल अंबानी आणि राज ठाकरे यांच्याकडून. राज आणि अनिल आपल्या भावांपेक्षा जास्त तडफदार मानले जात होते. अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन सुरु करुन यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली होती. तर राज यांनीही मनसेची स्थापना केल्यानंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्या होत्या.

मात्र नियतीचा खेळ काही एवढा सोपा नाही. सुरुवातीच्या यशानंतर वेळ पालटली आणि अंनिल अंबानींना मुकेश अंबानींकडून मिळणारा स्वस्त गॅस बंद झाला. रिलायन्सची नवी कंपनी शेअर बाजारात उतरताच तोंडावर पडली. 2008  च्या प्रचंड आर्थिक मंदीत ही कंपनी गटांगळ्या खाऊ लागली. त्याचवेळी राज ठाकरे यांची वाटही डळमळू लागली. सुरुवातीच्या यशानंतर मनसेला नंतर यश दिसलं नाही. 2014 मध्ये मोदींवर विश्वास ठेवणं राज ठाकरेंसाठी धोकादायक ठरलं. लोकसभेत त्यांच्या अर्ध्याहून अधिक उमेदावारांचे डिपॉझिट जप्त झाले.तर विधानसभेत कसाबसा केवळ एक आमदार निवडून आला.

ठाकरे आणि अंबानी दोन्ही कुटुंबांमधलं हे वळणही एकत्रच आलं. 2019 मध्ये अनिल अंबानी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. कर्ज चुकवलं नाही तर जेलमध्ये जायची वेळ आली. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. उरला सुरला एक आमदारही पक्ष सोडून गेला. कोणताही पक्ष त्यांना सोबत घेण्यास तयार नाही. मात्र दिवस कायम तसेच राहत नाहीत.

या दोघांच्या कहाणीत हे नवं वळणही एकाच वेळी आलं. दोन्ही घरात याच वर्षी लग्नं निघाली. लग्नाच्या निमित्तानं दोन्ही भाऊ एकमेकांना भेटले. काही मिनिटांसाठी का होईना ते एकमेकांसमोर आले, व्यवसायातील, राजकारणातील कटुतेवर नात्यातील गोडव्यानं मात केली.

मात्र सुखानंतर पुन्हा दुःखाचे दिवस सुरु झाले. मुकेश अंबानींचा छोटा भाऊ अनिलवर जेलवारीचं संकट येऊ घातलं. तर तिकडे राजसोबत कोणताही पक्ष हातमिळवणी करण्यास तयार नाही. अखेर त्यांनी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता मात्र या कहाण्या वेगळ्या होत आहेत.

लहान भावावरचं संकट पाहून मुकेश अंबानींनी त्यांचं सारं कर्ज फेडलं आणि दोघा भावांमध्ये हिंदी फिल्मप्रमाणे हॅप्पी एंडिंग झाला. अनिल अंबानींनीही मनापासून त्यांचे आभार व्यक्त केले. तिकडे उद्धव-राजमधील अहंकाराची लढाई अजून सुरुच आहे. हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर राज्याचं चित्रच बदलून जाईल असं सर्व राजकीय तज्ज्ञांना, विश्लेषकांना वाटतं. मात्र राजकारण आणि व्यवसायातील गणितं वेगळी असतात आणि ती नात्यातही दिसतात.

बॉलिवूडच्या भाषेत सांगायचं तर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.

VIDEO:

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.