VIDEO : काही सेकंदांचा अवधी, पूल जमीनदोस्त

ठाणे : शहापूरमधील काळूनदीवरील पूल इतिहासजमा झाला. ठाण्यातील शहापूर-मुरबाड जोडणारा काळूनदीवरील पूल स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आला. हा पूल फार जुना असल्याने तो धोकादायक झालेला होता. त्यामुळे सोमवारी स्फोट करुन हा पूल पाडण्यात आला. आता नवा पूल बांधण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या पूलावरुन होणाऱ्या वाहतूकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. शहापूर-मुरबाड या ठिकाणांना …

VIDEO : काही सेकंदांचा अवधी, पूल जमीनदोस्त

ठाणे : शहापूरमधील काळूनदीवरील पूल इतिहासजमा झाला. ठाण्यातील शहापूर-मुरबाड जोडणारा काळूनदीवरील पूल स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आला. हा पूल फार जुना असल्याने तो धोकादायक झालेला होता. त्यामुळे सोमवारी स्फोट करुन हा पूल पाडण्यात आला. आता नवा पूल बांधण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या पूलावरुन होणाऱ्या वाहतूकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
शहापूर-मुरबाड या ठिकाणांना जोडणारा हा पूल पाडण्यात आल्याने याचा फटका शाळकरी मुले तसेच या पूलावर रोजची वाहतीक करणाऱ्यांना बसणार आहे. पूल पाडण्याआधी रस्त्याची पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते, मात्र कुठलीही पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नवीन पूल पावसाळ्या पर्यंत तयार झाला नाही, तर येणाऱ्या पावसाळ्यात खुप मोठी समस्या उद्भवू शकते.
 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *