VIDEO : गोमू तुझ्या संगतीनं 'युती'वर निर्णय होणार काय?

मुंबई : केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना आणि हे दोन्ही पक्ष गेल्या 25-30 वर्षांपासूनचे मित्रपक्ष असताना, दोन्ही पक्षातली खडाजंगी काही नवीन नाही. या-ना त्या कारणावरुन एकमेकांवर शरसंधान साधायला दोन्ही पक्षातील अगदी मोठ-मोठे नेते सुद्धा मागे-पुढे पाहत नाही. कधी सत्तेला लाथ मारण्याची भाषा होते, तर स्वबळाची. अनेकदा तर खिशातून राजीनामे फिरवत सत्ताभोग घेताना दिसतात. मात्र …

, VIDEO : गोमू तुझ्या संगतीनं ‘युती’वर निर्णय होणार काय?

मुंबई : केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना आणि हे दोन्ही पक्ष गेल्या 25-30 वर्षांपासूनचे मित्रपक्ष असताना, दोन्ही पक्षातली खडाजंगी काही नवीन नाही. या-ना त्या कारणावरुन एकमेकांवर शरसंधान साधायला दोन्ही पक्षातील अगदी मोठ-मोठे नेते सुद्धा मागे-पुढे पाहत नाही. कधी सत्तेला लाथ मारण्याची भाषा होते, तर स्वबळाची. अनेकदा तर खिशातून राजीनामे फिरवत सत्ताभोग घेताना दिसतात. मात्र म्हणतात ना, ‘तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना’. असंच काहीसं सेना-भाजप युतीचं आहे. हेच नेमकं एका व्हिडओतून अत्यंत खुमासदार पद्धतीने मांडलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फेसबुकवरील ‘पुण्याचा सरपंच’ या पेजवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘युतिया साँग’ असे या व्हिडीओला नाव देण्यात आले आहे. सुधीर मोघे लिखित आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या ‘गोमू तुझ्या संगतीनं…’ या गाण्याचा वापर करत, पात्रांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चेहरे जोडून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. गाण्याचा नेमका वापर करुन शिवसेना-भाजप युतीचे अंतर्गत कलह विडंबन करत खुमासदार पद्धतीने मांडले आहेत.

शिवसेना-भाजपच्या युतीतल्या नात्यावर नेमके भाष्य करणारे हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘गोमू तुझ्या संगतीनं…’

गीतकार सुधीर मोघे यांनी ‘गोमू तुझ्या संगतीनं..’ हे गीत लिहिले असून, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आहे. मूळ गाणं आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलं होतं. ‘हा खेळ सावल्यांचा’ या 1976 साली दिग्दर्शित झालेल्या प्रसिद्ध सिनेमातील हे गाणं आहे.

पाहा व्हिडीओ :

आररर हे कोणी केलं रे ???

Posted by Punyacha Sarpanch – पुण्याचा सरपंच on Sunday, December 2, 2018

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *