मेट्रो कारशेड दुसरीकडे हलवण्याची तयारी पूर्ण, 'आरे'मधील जागेवर वन्यजीव संशोधन केंद्र?

आरे'मधील मेट्राची कारशेड दुसरीकडे हलवण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती तयारी झाल्याची माहिती समोर येत आहे (Wild life research centre at Arey Forest).

मेट्रो कारशेड दुसरीकडे हलवण्याची तयारी पूर्ण, 'आरे'मधील जागेवर वन्यजीव संशोधन केंद्र?

मुंबई : ‘आरे’मधील मेट्राची कारशेड दुसरीकडे हलवण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती तयारी झाल्याची माहिती समोर येत आहे (Wild life research centre at Arey Forest). आता ज्या ठिकाणी 2 हजार वृक्ष तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात आला त्या आरेच्या ठिकाणी पर्यावरणाशी संबंधित ‘वाईल्ड लाईफ फॉरेन्सिक लॅब’ किंवा ‘वाईल्ड लाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर’ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती खात्रिलायकरित्या समजते. तशा प्रकारचा प्रस्ताव तयार करुन तो मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

‘आरे’मधील मेट्रोची कारशेड पहाडी गोरेगाव येथे हलवण्याबाबत आवश्यक ती तयारी करण्याचे ते निर्देश मेट्रोच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कामही सुरु करण्यात आले आहे. मात्र, या आदेशानंतर आरेच्या ज्या जागेवर वृक्षतोड करण्यात आली आहे त्या जागेचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर या जागेवर पर्यावरणाशी आणि विशेषतः जंगलाशी संबंधित काम चालावे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे समजते.

राज्यात वन्यप्राण्यांवर त्यातही वाघांवर तस्करीच्या हेतून विषप्रयोग झाला. त्यांना सापळ्यात अडकवून ठार मारले गेले. त्यांच्यावर बंदूकीचा किंवा इतर हत्यारांचा वापर केला गेल्यास त्यांच्या मृत्यूंची कारणमिमांसा करण्यासाठी त्यांचे अवशेष हैद्राबाद येथील वाईल्डलाईफ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवावे लागतात. मात्र संबंधित तपासणी महाराष्ट्रातच व्हावी या हेतूने ही प्रयोगशाळा आरेमध्ये उभी करण्यात येणार आहे.

शिवाय राज्यात अद्ययावत वाईल्ड लाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरही या ठिकाणी उभारता येईल. त्यामुळे यादृष्टीने प्रस्ताव तयार करुन तो सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. विशेष म्हणजे या जोडीने वाईल्ड लाईफ वेटरनरी हॉस्पिटलचा पर्याय देखील पडताळून पाहता येईल, अशी सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्यानुसारही आवश्यक ती माहिती घेऊन प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे कळते.

दरम्यान,  कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो 3 ची कारशेड आरेमध्ये करण्याबाबत तत्कालीन भाजप सरकारने निर्णय घेतला. यानंतर मेट्रोच्या कामासाठी येथील वृक्षांची कत्तल करावी लागणार होती. त्याशिवाय प्रकल्पाचे काम पुढे सरकणार नव्हते. मात्र याला पर्यावरणवाद्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला.

शिवसेनेने यात आग्रही भूमिका घेत मेट्रो कारशेडला विरोध केला. यात युवासेने आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत आरे कारशेड प्रकरणात कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला होता. यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेत कारशेडसाठी वृक्षतोड केल्यास वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

यावेळी आरेतल्या बिबट्या, हरणांचा वावर असल्याचे सिद्ध करणारे फोटोही दाखविण्यात आले होते. कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वन्यजीवांचा अधिवासच धोक्यात येईल असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. प्रस्तावित कारशेडपासून केवळ 500 मीटर अंतरावर दुर्मिळ रानमांजरं आढळून आली होती. याच भागात विंचवाच्या 6 प्रजाती आढळून येतात. त्यामुळे केवळ वृक्षतोडीचा विषय नव्हे, तर संपूर्ण पर्यावरण संस्थेचाच विषय असल्याचेही आदित्य यांनी म्हटले होते.

Wild life research centre at Arey Forest

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *