राज्यात हुडहुडी, निफाडमध्ये 2.4, मुंबईत 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

मुंबईत शुक्रवारी सकाळी 12.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकच्या निफाडमध्ये या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचे तापमान 2.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

राज्यात हुडहुडी, निफाडमध्ये 2.4, मुंबईत 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 9:00 AM

मुंबई : मुंबईसह राज्यात गुरुवारपासून थंडीचा जोर वाढला आहे (Winter in Maharashtra). मुंबईत शुक्रवारी सकाळी 12.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकच्या निफाडमध्ये या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचे तापमान 2.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. निफाडमधील कुंडेवाडीच्या हवामान विभागात ही नोंद करण्यात आली आहे (Winter in Maharashtra).

मुंबईत इतर शहरांच्या तुलनेत कमी थंडी पडते. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची हौस वाटते. बऱ्याच मुंबईकरांना हवीशी वाटणारी ही थंडी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत दाखल झाली आहे. काल (16 जानेवारी) मुंबईचे कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसवर पोहोचले. हा पारा शुक्रवारी सकाळी 12.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला. आज या मोसमातील सर्वाधिक थंडीची नोंद झाली आहे.

थंडी वाढल्यामुळे मुंबईकरांना आता स्वेटर घालून ऑफिसला जावं लागणार आहे. मुंबईत गुरुवारी दुपारच्या वेळी हवेचा पारा हा 25 अंश सेल्सिअर होता. त्यामुळे सकाळपासून सुरु असलेला गारवा दुपारी देखील जाणवत होता. दरम्यान, मुंबईच्या हवामाणातील गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवानान विभागाने दिला आहे. पुढचे दोन ते तीन दिवस हवेतील गारवा कायम असणार आहे.

उत्तरी भागातून वाहणाऱ्या थंड वारे आणि कोरडे वातावरण यामुळे मुंबईसह राज्यात कमालीची थंडी वाढली आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही थंडी सुरु झाली आहे. संपूर्ण राज्यभरात हवेत गारठा आहे. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंडी पडली आहे. त्यापाठोपाठ महाबळेश्वर येथे थंडीचा कडाका सुरु आहे.

राज्यातील औरंगाबादमध्ये 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नांदेडमध्ये 14.0 अंश सेल्सिअस तर  अहमदनगरमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.