‘फ्री काश्‍मीर’ पोस्‍टरचा नेमका अर्थ काय? पोस्टर दाखवणारी तरुणी म्हणते…

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्लाविरोधात मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मात्र, एका पोस्टरकडे बोट दाखवतं भाजपने विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाच लक्ष्य केलं. या पोस्टरवर ‘फ्री काश्मीर’ (Meaning of poster Free Kashmir) असं लिहिलेलं होतं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:34 PM, 7 Jan 2020

मुंबई : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्लाविरोधात मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मात्र, एका पोस्टरकडे बोट दाखवतं भाजपने विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाच लक्ष्य केलं. या पोस्टरवर ‘फ्री काश्मीर’ (Meaning of poster Free Kashmir) असं लिहिलेलं होतं. याचा नेमका काय अर्थ आहे आणि हे पोस्टर दाखवताना त्या तरुणीने कोणत्या भावनेने हे पोस्टर दाखवले याचं तिनेच उत्तर दिलं आहे. याबद्दल या तरुणींने युट्युबवर याबाबत एक व्हिडीओ पोस्ट करत आपली बाजू स्पष्ट केली (Meaning of poster Free Kashmir).

पोस्टर दाखवणारी आणि आंदोलनात सहभागी झालेली मेहक प्रभू ही तरुणी म्हणाली, “मी भारताची नागरिक या नात्याने जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाले होते. तेथे अनेक तरुण वेगवेळे पोस्टर तयार करत होते. त्यात देशातील विविध प्रश्नांवर पोस्टर तयार केले जात होते. तेथेच काश्मीरचं हे पोस्टर होतं. ते पाहून माझ्या मनात काश्मीरवर लादलेले निर्बंध आठवले. कारण आम्ही येथे नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांसाठी जमलो होते. मागील 5 महिन्याहून अधिक काळापासून काश्मिरमध्ये अनेक गोष्टींवर बंदी आहे. म्हणूनच मी काश्मिरच्या नागरिकांनाही संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावा ही मागणी करण्यासाठी मी ‘फ्री काश्मीर’ हे पोस्टर दाखवलं.”

मी काश्मीरी किंवा कोणत्याही गँगची मुलगी नसून महाराष्ट्रात जन्मलेली मराठी मुलगी असल्याचंही यावेळी या तरुणीने स्पष्ट केलं.