VIDEO : डिलिव्हरी गर्लची गुंडगिरी, भररस्त्यात पोलिसांना अर्वाच्च्य शिवीगाळ

नो पार्किंगमधील दुचाकीचा फोटो काढताना पोलिसांचा मोबाईलही हिसकावून घेतला. या तरुणीवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

VIDEO : डिलिव्हरी गर्लची गुंडगिरी, भररस्त्यात पोलिसांना अर्वाच्च्य शिवीगाळ

नवी मुंबई : वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका झोमॅटो गर्लचा व्हिडीओ (Zomato delivery girl video) मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नवी मुंबईतील वाशीमधील हा व्हिडीओ आहे. पोलिसांनी नो पार्किंगचा दंड ठोठावल्यामुळे या तरुणीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अत्यंत अश्लील शिवीगाळ करत अरेरावी (Zomato delivery girl video) केली. शिवाय नो पार्किंगमधील दुचाकीचा फोटो काढताना पोलिसांचा मोबाईलही हिसकावून घेतला. या तरुणीवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रियंका मोगरे असं या तरुणीचं नाव असून ती झोमॅटोची डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करते. या तरुणीने पोलिसांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळच केली नाही, तर त्यांच्यावर मानहानीकारक आरोपही केले. पोलिसांचा चोर असा उल्लेख करत शिवीगाळही केली आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यावर धावून गेल्याचंही या व्हिडीओत दिसतंय.

प्रियंका मोगरे ही मुंबईतील विले पार्ले येथील रहिवासी आहे. गेल्या एक वर्षापासून ती झोमॅटोसाठी काम करते. पोलिसांनी प्रियंकावर पोलिसांना अश्लील शिवीगाळ देणे, मोबाईल हिसकावणे, सरकारी कर्मचाऱ्यावर धावून जाणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांशी हुज्जत घालणारी ही तरुणी एवढ्यावरच थांबली नाही. पोलीस स्टेशनमध्ये वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या एका छायाचित्रकारावरही ती धावून गेली.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *