लहान भावंडांसाठी 11 वर्षीय मुलीने तब्बल दीड लाख रुपये चोरले!

लखनऊ : उत्तर प्रदेशातील नोएडा येथे चोरीप्रकरणी 11 वर्षीय मुलीला अटक केली आहे. या मुलीच्या चोरीचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. लहान भावंडांसाठी चॉकलेट आणि खेळणी खरेदी करण्यासाठी या अल्पवयीन मुलीने चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सुमारे दीड लाख रुपयांची चोरी या अल्पवयीन मुलीने केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, “मुलीचे वडील रिक्षा चालक …

लहान भावंडांसाठी 11 वर्षीय मुलीने तब्बल दीड लाख रुपये चोरले!

लखनऊ : उत्तर प्रदेशातील नोएडा येथे चोरीप्रकरणी 11 वर्षीय मुलीला अटक केली आहे. या मुलीच्या चोरीचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. लहान भावंडांसाठी चॉकलेट आणि खेळणी खरेदी करण्यासाठी या अल्पवयीन मुलीने चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सुमारे दीड लाख रुपयांची चोरी या अल्पवयीन मुलीने केल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, “मुलीचे वडील रिक्षा चालक आहेत. चोरीची घटना सोमवारी सदरपूर कॉलनीमध्ये घडली. तक्रारदार राजकुमार शर्मा (27) यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, मी कामानिमित्त बाजूला गेलो होतो. पाच मिनिटात परत येणार असल्याने तळ मजल्यावरील घराचा दरवाजा उघडा ठेवला होता.”

“जेव्हा मी घरी परतलो तर माझ्या चार सोन्याच्या अंगठ्या आणि 65 हजार रुपये गायब होते. गेटजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामधील दृश्य पाहिल्यावर चोरी झाल्याची घटना समोर आली. एक मुलगी घरात घुसली आणि किंमतीच्या वस्तू घेऊन घरातून बाहेर पडताना दिसली. गुरुवारी याच मुलीला मी माझ्या घराजवळ पाहिल्यावर मला सीसीटीव्ही कॅमेरातील मुलीचा चेहरा मिळता जुळता दिसला. मी तातडीने पोलिसांना फोन लावून बोलावून घेतले.”, असे तक्रारदाराने सांगितले.

दरम्यान, मुलीला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. तिने सांगितले की, तिला तिच्या दोन लहान बहीण आणि भावांसाठी चॉकलेट आणि खेळणी खरेदी करायची होती. या दरम्यान त्या मुलीने पोलिसांना सांगितलं की, एका महिलेने तिच्याकडून चोरीच्या सर्व वस्तू घेतल्या, त्या महिलेने तिला घरचा पत्ता दिला होता आणि सर्व सामानाच्या बदल्यात पाचशे रुपये दिले. असं पोलिस अधिकारी उदय प्रताप सिंह यांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *