कुणाच्या डोक्याला लागलं, तर कुणाच्या पायाला… बॅगा, सुटकेस मिळेना… रेल्वे अपघातात चौघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. एक्सप्रेसचे डब्बे रुळावरून घसरल्याने चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 27 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांवर तात्काळ उपचार करण्यात येत आहे. तसेच एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढलं जात आहे. या मदतकार्यात विलंब होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कुणाच्या डोक्याला लागलं, तर कुणाच्या पायाला... बॅगा, सुटकेस मिळेना... रेल्वे अपघातात चौघांचा मृत्यू
Chandigarh-Dibrugarh ExpressImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 5:32 PM

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात आज एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास डिब्रूगढ़ एक्सप्रेस (15904)चे सुमारे 12 डब्बे रुळावरून घसरले. ही एक्सप्रेस चंदीगडवरून डिब्रुगढला जात होती. तेव्हा हा अपघात झाला. झिलाही आणि मोतीगंज रेल्वे स्थानकाच्या तीन किलोमीटरच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून 27 प्रवाशी जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अफघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आले असून बचावकार्य सुरू आहे.

चंदीगडहून ही ट्रेन निघाली होती. गोंडापासून 20 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. दोन बोगी रुळावरून उतरल्या. त्यामुळे रुळ उखडली गेली. हा अपघात झाल्याने अनेकजण भयभीत झाले. गाडीतील सामान भराभरा अंगावर पडल्याने कुणाच्या डोक्याल, कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला जबर मार लागला. काहींच्या बॅगा हरवल्या तर काहींच्या सुटकेस मिळेनाशा झाल्या. अपघात होताच प्रवाशांनी एकच आक्रोश केला. आपण जगू की नाही? असं त्यांना सुरवातीला वाटलं. पण सुदैवाने चार प्रवासी वगळता सर्वांचे प्राण वाचले. या अपघातात 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे आदेश

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची माहिती घेतली असून तात्काळ रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रेल्वे पूर्ववत सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. आसाम सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार एकमेकांच्या संपर्कात असून प्रवाशांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काचा फोडून प्रवासी बाहेर

या अपघाताचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात अपघाताची परिस्थिती दिसून येते. एक्सप्रेसचे कोच पलटी झाले आहे. दोन्ही कोच एसी आहेत. या डब्ब्यातील प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकांनी सर्वात आधी घटनास्थळी येऊन मदतकार्य सुरू केलं. जिल्हा प्रशासन आणि रेल्वेची टीमही मदतकार्य करत आहे. एसी कोचमध्ये फसलेल्या लोकांना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढलं जात आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून प्रवाशांना कशी मदत केली जात आहे हे दिसत आहे.

हेल्पनंबर जारी

वाणिज्यिक नियंत्रण- 9957555984

फुरकेटिंग (एफकेजी)- 9957555966

मरियानी (एमएक्सएन)- 6001882410

सिमलगुरी (एसएलजीआर)- 8789543798

तिनसुकिया (एनटीएसके)- 9957555959

डिब्रूगढ़ (डीबीआरजी)- 9957555960

40 मेडिकल टीम घटनास्थळी

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी 40 मेडिकल टीम पाठवण्यात आल्या. तर 15 रुग्णवाहिकाही घटनास्थली दाखल झाल्या. किरकोळ जखमींवर तिथल्या तिथेच उपचार केले जात आहेत. तर गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...