बिहारमध्ये लिचीमुळे 19 मुलांचा मृत्यू

बिहारमध्ये लिचीमुळे होणारा आजार इन्सेफलाईटीसने आतापर्यंत 19 मुलांचा बळी घेतला आहे.

बिहारमध्ये लिचीमुळे 19 मुलांचा मृत्यू

पाटणा : बिहारमध्ये लिचीमुळे होणारा आजार इन्सेफलाईटीसने (AES) आतापर्यंत 19 मुलांचा बळी घेतला आहे. गेल्या पाच दिवसांत या इन्सेफलाईटीस तापानो मुजफ्फरपूरमध्ये 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. एकट्या श्री कृष्णा रुग्णालयात (SKMCH) 15 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर खाजगी रुग्णालयांमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक मुलं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही बिहार सरकार मृतांचा आकडा उघड न होऊ देण्याच्या प्रयत्नात आहे.

इन्सेफलाईटीस तापाने ग्रसीत मुलांना अॅक्यूट इन्सेफलाईटीस सिंड्रोम (Acute Encephalitis Syndrome) झालेला मानून सिस्टीमच्या आधारे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुलं या इन्सेफलाईटीस तापाने दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने 22 मुलांचा मृत्यू झाला होता. मात्र, प्रशासनाला अज्ञापही जाग आलेली नाही.

अॅक्यूट इन्सेफलाईटीस सिंड्रोममुळे होणारा ताप मुजफ्फरपूर आणि त्याच्या आजुबाजूच्या परिसरात गेल्या पाच-सहा वर्षांपासून कहर करतो आहे. दरवर्षी मान्सूनच्यापूर्वी हा आजार पसरतो. विशेष म्हणजे हा आजार केवळ पाच ते दहा वयोगटातील मुलांना होतो. 2014 पासून या आजाराने दरवर्षी अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागत आहे. पण, राज्य सरकारने याबाबत अज्ञाप कुठलीही गंभीर दखल घेतलेली नाही.

विश्व आरोग्य संगठनच्या रिपोर्टनुसार, अर्धी पिकलेली लिचीमुळे AES हा आजार होतो. लिचीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा तत्व आढळतो, याने हा आजार होतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *