1984 ची दंगल नव्हती, राजीव गांधींच्या आदेशाने झालेला नरसंहार होता : माजी DGP

नवी दिल्ली : शिख दंगलींबाबत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसलाही स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. आता माजी पोलीस महासंचालक सुलखान सिंह यांनी एक खुलासा केलाय, ज्यामुळे राजकारण आणखी तापण्याची चिन्हं आहेत. 1984 ची शिख दंगल नव्हती, तर राजीव गांधी यांच्या आदेशावर त्यांच्या विश्वासू काँग्रेस नेत्यांनी स्वतः केलेला नरसंहार […]

1984 ची दंगल नव्हती, राजीव गांधींच्या आदेशाने झालेला नरसंहार होता : माजी DGP
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नवी दिल्ली : शिख दंगलींबाबत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसलाही स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. आता माजी पोलीस महासंचालक सुलखान सिंह यांनी एक खुलासा केलाय, ज्यामुळे राजकारण आणखी तापण्याची चिन्हं आहेत. 1984 ची शिख दंगल नव्हती, तर राजीव गांधी यांच्या आदेशावर त्यांच्या विश्वासू काँग्रेस नेत्यांनी स्वतः केलेला नरसंहार होता, असं सुलखान सिंह यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलंय.

सुलखान सिंह हे 1980 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक आहेत. इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दिवशी 31 ऑक्टोबर 1984 रोजी मी पंजाब मेल ट्रेनने लखनौहून वाराणसीला जात होतो, असं सुलखान सिंह यांनी म्हटलंय.

ट्रेन अमेठी स्टेशनवर उभी होती, त्याचवेळी एक व्यक्ती, जो अमेठीतून ट्रेनमध्ये चढला होता, त्याने सांगितलं की इंदिरा गांधींना गोळ्या घातल्या गेल्या. वाराणसीपर्यंत काही झालं नाही. वाराणसीमध्ये पुढच्या दिवशीही काही झालं नाही. त्यानंतर योजनाबद्ध पद्धतीने घटना घडल्या. जर लोकांचा संताप अनावर झाला तर आऊट बर्स्ट होऊन लगेच दंगल सुरु होते, असं सुलखान सिंह यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. ही सर्व योजना तयार करुन शिखांचा नरसंहार करण्यात आला. तत्कालीन काँग्रेस नेते भगत, टाईटलर, माकन, सज्जन कुमार मुख्य सूत्रधार होते, असा दावा सुलखान सिंह यांनी केलाय.

राजीव गांधींचे विश्वासू कमलनाथ (विद्यमान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री) सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होते. नरसंहारावर राजीव गांधींचं वक्तव्य आणि तेव्हाच्या सर्व काँग्रेस नेत्यांना संरक्षणासह चांगल्या पदांवर नियुक्ती हे पुरावे आहेत. राजीव गांधींच्या मृत्यूनंतरही काँग्रेसच्या सरकारकडून या व्यक्तींना संरक्षण हे यांची सहमती दर्शवतं, असं सुलखान सिंह यांनी म्हटलंय.

दरम्यान, सुलखान सिंह यांच्याकडे कोणता पुरावा असेल तर तो त्यांनी तातडीने सरकारसमोर किंवा थेट एसआयटीसमोर आणावा, असं आवाहन कानपूर शिख दंगलीच्या तपासासाठी नियुक्त एसआयटीचे प्रमुख माजी डीजीपी अतुल यांनी केलंय.

काय आहे शिख दंगल?

पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शिख बॉडीगार्डकडून हत्या करण्यात आली. त्यानंतर शिख दंगलींना सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात शिख लोकांची हत्या करण्यात आली. सरकारी आकड्यांनुसार 2800 जणांचा यात मृत्यू झाल होता, तर विविध रिपोर्टनुसार 8 हजार ते 17 हजार जणांचा या दंगलीत मृत्यू झाला होता. विविध समित्या आणि आयोगाकडून या दंगलीची चौकशी झाली, पण आरोपींना शिक्षा होऊ शकली नाही. 2000 साली निवृत्त न्यायमूर्ती जी. टी. नानावटी यांच्या अध्यतेखाली एका आयोगाची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांची दंगलीत भूमिका असल्याचं सांगितलं गेलं. भाजपच्या दाव्यानुसार, राजीव गांधींचा सहभाग असल्याचं नानावटी आयोगाने सांगितल्याचं भाजपचं म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.