दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं भीतीचे वातावरण आहे. दिल्लीसह पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल होती. सकाळी 8 च्या सुमारास हे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र उत्तर प्रदेशच्या बागपत इथे आहे. सुदैवाने भूकंपामुळे सध्यातरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नाही. भूकंपाचं केंद्र …

दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं भीतीचे वातावरण आहे. दिल्लीसह पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल होती. सकाळी 8 च्या सुमारास हे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र उत्तर प्रदेशच्या बागपत इथे आहे. सुदैवाने भूकंपामुळे सध्यातरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नाही. भूकंपाचं केंद्र 5 किमी आत होता.

दरम्यान, आज सकाळी केवळ दिल्ली, उत्तर प्रदेशातच नाही तर जगभरात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगण्यात येत आहे. तझाकिस्तान आणि अमेरिकेच्या काही भागातही भूकंपाचे धक्के बसले आहेत.

भूकंप सारखे का होतात?

पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग 7 टेक्टोनिक प्लेटने मिळून तयार झालेला आहे. जेव्हाही या प्लेट एकमेकांवर आदळतात त्यावेळी भूकंप होतो. ज्यावेळी भूकंप येतो त्यावेळी या प्लेट एकमेकांच्या क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करतात. यावेळी जी ऊर्जा तयार होते त्याने जमीन हलते आणि ती दुभंगण्याचा धोका निर्माण होतो. अनेकदा भूकंपाची तीव्रता जास्त असेल, तर ऑफ्टरशॉक अर्थात भूकंपानंतरच्या धक्क्यांनी जास्त नुकसान होण्याची भीती असते.

भूकंपाच्या तीव्रतेचे परिणाम

0 ते 1.9 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप सीज्मोग्राफने समजू शकते.

2 ते 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप छोटे धक्के लागल्याचे जाणवते.

3 ते 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने एखादा ट्रॅक तुमच्या बाजूने जात असल्याचे जाणवते.

4 ते 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने खिडक्या तुटतात, भिंतीवरील फ्रेम पडू शकतात.

5 ते 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने फर्नीचर हलू शकतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *