Monkeypox: टेन्शन वाढवणारी बातमी; केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण सापडल्याने खळबळ

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील हा रुग्ण परदेश वारी करुन आला होता. 12 जुलै रोजी हा रूग्ण केरळच्या त्रिवेंद्रम विमानतळावर दाखल झाला होता. यानंतर याची तपासणी केला असता याला मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोग्य यंत्रणेकडून WHO आणि ICMR ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पावले उचलली जात आहेत.

Monkeypox: टेन्शन वाढवणारी बातमी; केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण सापडल्याने खळबळ
मंकीपॉक्स समलैंगिक संबंधातून होतो का?
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 5:11 PM

नवी दिल्लीः देशात कोरोनाचे (Corona) संकट कमी होत असतानाच आता मंकीपॉक्सचा (Monkeypox) धोका वाढला आहे. गेल्या आठवड्यात केरळमध्ये मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळला होता. त्यातच आता केरळमध्येच मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. केरळमधील कन्नूर जिल्ह्यातून मंकीपॉक्सच्या दुसऱ्या रुग्णाची नोंद झाली आहे. केरळचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील हा रुग्ण परदेश वारी करुन आला होता. 12 जुलै रोजी हा रूग्ण केरळच्या त्रिवेंद्रम विमानतळावर दाखल झाला होता. यानंतर याची तपासणी केला असता याला मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोग्य यंत्रणेकडून WHO आणि ICMR ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पावले उचलली जात आहेत.

14 जुलै रोजी सापडला होता केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

यापूर्वी 14 जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला होता. संक्रमित व्यक्ती युएईतून भारतात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात 11 जण आले होते. या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.

व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासणीसाठी देण्यात आले होते, त्यानंतर या प्रकरणाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली होती. आता दुसरा रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमानतळावर दाखल होणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच राज्यात मार्गदर्शक नियावली देखील जारी करण्यात आली आहे.

मंकीपॉक्स विषाणूजन्य रोग

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असून हा रोग 1958 मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळून आला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स असे नाव पडले. हा विषाणू हवेतून पसरत नाही, मात्र माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाला तर त्याची लागण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

या आजाराची लक्षणे

पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. साधारण 2 ते 4 आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर 1 टक्के ते 10 टक्क्यांपर्यंत आहे. तसेच मंकीपॉक्सचा संसर्गापासून लक्षणांपर्यंतचा काळ साधारणतः 7 ते 14 दिवसांचा असतो. मात्र तो 5 ते 21 दिवसांपर्यंत वाढू शकतो असे यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.