यमुना द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; गाडीमधल्या आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू

कारमध्ये लागलेल्या आगीत पाच लोकांचा होरपळून मृत्यू झालाय. Agra City Five People Burnt Alive Due To Fire In Car On Yamuna Expressway

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:11 AM, 22 Dec 2020
यमुना द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; गाडीमधल्या आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू

आग्रा : यमुना द्रुतगती महामार्गावर मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात घडलाय. आग्र्याहून नोएडाकडे जाणाऱ्या भरधाव कारने डिझेल कंटेनरला धडक दिली. कंटेनर आणि कारचा अपघात घडल्यानंतर कारला भीषण आग लागली. कारमध्ये लागलेल्या आगीत पाच लोकांचा होरपळून मृत्यू झालाय. कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे कारमधील आगीत पाच जण जळाले असून, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलंय. (Agra City Five People Burnt Alive Due To Fire In Car On Yamuna Expressway)

कारला लागलेली आग भीषण होती, या आगीत चालकांचे फक्त सांगाडे शिल्लक राहिलेले दिसत आहेत. गाडी लखनऊची होती. डीएम प्रभू एन सिंग आणि एसएसपी बबलू कुमार घटनास्थळी दाखल झाले आहेत. कारमध्ये जळालेल्या लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. स्विफ्ट डिझायर कार क्रमांक यूपी 32 केव्ही 6788 आग्रा येथून लखनऊकडे जात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदौली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात 160 किलोमीटर अंतरावर कंटेनर पुढे जात होता. कंटेनरच्या ड्रायव्हरने अचानक स्टेअरिंग फिरवलं, त्यामुळे बाजूनं भरधाव वेगात येणाऱ्या गाडीला कंटेनर धडकला. कंटेनरच्या डिझेल टँकलाच ही कार धडकल्यानं गाडीला प्रचंड आग लागली. गाडी चालक मोठ्यानं ओरडला. पण त्याचदरम्यान कार सेंट्रल लॉक झाल्यामुळे लॉक उघडता आले नाही.

जवळच यमुना एक्स्प्रेसचे एक बूथ असून, यातील कर्मचाऱ्याने या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. तोपर्यंत ड्रायव्हर कंटेनर सोडून पळून गेला होता. अपघाताच्या काही क्षणांतच कारनं पेट घेतला आणि त्यात अडकलेले लोक बाहेर पडू शकले नाहीत. अग्निशमन दलाने गाडीला लागलेली आग विझविण्यासाठी पाच फायर ब्रिगेडच्या गाड्या मागवल्या. जिवंत जळालेल्या लोकांमध्ये एक मूल, एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. कारचा नंबर ओळखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित बातम्या

ट्रॅक्टर-कारची भीषण धडक, बर्थडे बॉयच्या डोळ्यांदेखत चौघा मित्रांचा मृत्यू

Agra City Five People Burnt Alive Due To Fire In Car On Yamuna Expressway