GHMC Election | जिथे शाह-योगी गेले, तिथे भाजपचा पराभव, हैदराबाद निवडणुकीवरून ओवेसींचा हल्लाबोल

ओवेसी यांनी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. Aimim President Asaduddin Owaisi Speaks After Greater Hyderabad Municipal Election Result

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:58 AM, 5 Dec 2020
Asaduddin Owaisi on amit shah

तेलंगणाः ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठं यश मिळालं आहे. 2016 मध्ये 4 जागा जिंकणार्‍या भाजपने यावेळी झालेल्या निवडणुकीत 48 जागांवर विजय मिळवला. त्याच वेळी असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएम 44 जागा जिंकण्यात यशस्वी ठरला. हैदराबाद निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कामगिरीवर खूश असल्याचे सांगितले. (Aimim President Asaduddin Owaisi Speaks After Greater Hyderabad Municipal Election Result)

असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. ओवेसी म्हणाले की, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला. आम्ही लोकशाही मार्गाने भाजपशी लढू. आम्हाला विश्वास आहे की, तेलंगणातील जनता राज्यात भाजपचा विस्तार रोखेल, असंही असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे.

ग्रेटर हैदराबाद महापालिकेत आम्ही 44 जागा जिंकल्या. मी नव्याने निवडलेल्या सर्व नगरसेवकांशी बोललो आणि त्यांना शनिवारपासून काम सुरू करण्यास सांगितले. भाजपाचे एकदाच मिळालेलं यश आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत हे यश भाजपाला मिळणार नाही. या निवडणुकीत आम्ही कठोर परिश्रम केले आणि हैदराबादच्या लोकांनी दिलेला निर्णय आम्ही स्वीकारला आहे. महापालिका निवडणूक आहे, थोडं खाली-वर होणारच आहे. ओवेसी यांनी हैदराबादच्या जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, योगी आदित्यनाथ जिथे गेले तिथे काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. सर्जिकल स्ट्राईकबद्दल ते बोलले होते आता भाजपावर लोकशाही स्टाइक झाला आहे. आकडेवारी सर्वांसमोर आहे.

योगी आदित्यनाथ आपण अॅक्टिंग करू नका, वास्तवाच्या जगात- ओवेसी

ओवेसी म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री योगींना सांगू इच्छितो की, तुम्ही मुंबईला गेला होता. आपण अॅक्टिंग करू नका, वास्तवाच्या जगात या. दलितांवर होणारा अत्याचार संपवा. घटनेच्या विरोधात जाऊन आपण लव्ह जिहाद कायदा बनवित आहात. ते आधी थांबवा,  टीआरएसच्या तेलंगणाच्या क्षेत्रीय भावनेचे प्रतिनिधित्व करते. मला खात्री आहे की, चंद्रशेखर राव या निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतील. Aimim President Asaduddin Owaisi Speaks After Greater Hyderabad Municipal Election Result


देशातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक असलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. भाजपाने जबरदस्त कामगिरी करत 48 जागा जिंकल्या. त्याचवेळी केसीआरच्या टीआरएसने 56 जागा मिळवल्या आणि असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एमआयएमने 44 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मात्र यंदा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. 150 जागा असलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेत बहुमताचा आकडा 75 आहे.
मागील निवडणुकीत टीआरएसला बहुमत मिळाले होते.

2016 मध्ये झालेल्या ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत टीआरएसने 150 प्रभागांपैकी 99 जागा जिंकल्या होत्या, तर असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एमआयएमने 44 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला केवळ 4 जागांवर यश मिळवता आले होते. काँग्रेसने केवळ दोन प्रभागात विजय मिळविला होता.

Aimim President Asaduddin Owaisi Speaks After Greater Hyderabad Municipal Election Result

संबंधित बातम्या:

‘हैदराबाद संस्थानात’ भगवी लाट; पालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी; 49 जागांवर दणदणीत विजय

हैदराबाद पालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर; तरीही भाजपचा दक्षिणेवरील स्वारीचा मार्ग मोकळा?