एअर इंडियाची 137 उड्डाणे उशिरा

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या ‘चेक इन’ सॉफ्टवेअरमध्ये शनिवारी झालेल्या बिघाडाचा फटका आजही विमान उड्डाणांना बसत आहे. आज एअर इंडियाची 137 उड्डाणे उशिराने धावत आहेत. हा विलंब सरासरी 197 मिनिटांचा असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. एअर इंडियाचे पॅसेंजर सर्व्हिस सिस्टीम (PSS) हे सॉफ्टवेअर प्रवाशांचे चेक इन, बॅगेज आणि रिझर्व्हेशन आदी सेवांचे नियोजन करते. शनिवारी पहाटे 3.30 ते …

एअर इंडियाची 137 उड्डाणे उशिरा

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या ‘चेक इन’ सॉफ्टवेअरमध्ये शनिवारी झालेल्या बिघाडाचा फटका आजही विमान उड्डाणांना बसत आहे. आज एअर इंडियाची 137 उड्डाणे उशिराने धावत आहेत. हा विलंब सरासरी 197 मिनिटांचा असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

एअर इंडियाचे पॅसेंजर सर्व्हिस सिस्टीम (PSS) हे सॉफ्टवेअर प्रवाशांचे चेक इन, बॅगेज आणि रिझर्व्हेशन आदी सेवांचे नियोजन करते. शनिवारी पहाटे 3.30 ते 8.45 वाजेपर्यंत या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे एअर इंडियाच्या जगभरातील उड्डाणांवर परिणाम झाला. यात प्रवाशांचेही अतोनात हाल झाले.

या बिघाडाचा परिणाम शनिवारपर्यंत मर्यादित न राहता, दुसऱ्या दिवशीच्या उड्डाणांवरही झाला आहे. शनिवारी 149 उड्डाणे विलंबाने होती, तर आज 137 विमाने उशिराने उड्डाण करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *