सोहराबुद्दीन शेख चकमक : पुरावे नाहीत, सर्व आरोपी निर्दोष

मुंबई : सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील सर्व आरोपी पुराव्यांअभावी निर्दोष सुटले आहेत. सीबीआयच्या विशेष कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याचा निकाल दिला आहे. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात एकूण 22 आरोपी होते, ते सर्व निर्दोष सुटले आहेत. संबंधित बातमी : काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण? सर्व साक्षीदार आणि पुरावे सोहराबुद्दीन शेख चकमक खोटी होती, हे सिद्ध करण्यास …

, सोहराबुद्दीन शेख चकमक : पुरावे नाहीत, सर्व आरोपी निर्दोष

मुंबई : सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील सर्व आरोपी पुराव्यांअभावी निर्दोष सुटले आहेत. सीबीआयच्या विशेष कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याचा निकाल दिला आहे. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात एकूण 22 आरोपी होते, ते सर्व निर्दोष सुटले आहेत.

संबंधित बातमी : काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण?

“वकिलांनी खूप प्रयत्न केला, 210 साक्षीदारांना आणले, मात्र कुठलाच पुरावा समाधानकारक नाही आणि साक्षीदारही आपल्या जबाबावरुन फिरले. अर्थात, साक्षीदार बोलले नाहीत, यात वकिलाची चूक नाही.” असेही सीबीआयच्या विशेष कोर्टाने नमूद केले.

26 नोव्हेंबर 2005 रोजी अहमदाबादमधील विशाला सर्कलच्या जवळ टोलनाक्यावर सोहराबुद्दीन शेख आणि त्यांची पत्नी कौसर बी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला. त्यानंतर ही बनावट चकमक असल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला तुलसीराम प्रजापतीलाही गुजरात-राजस्थान सीमेनजिक चापरी येथे 27 डिसेंबर 2006 रोजी ठार करण्यात आले. यावेळीही बनवाट चकमक करुन प्रजापतीला ठार केल्याचा आरोप होता.

निर्दोष सुटलेल्या 22 आरोपींची नावे :

1)मुकेश कुमार लालजी भाई परमार
2)नारशिंग हरिशिंग दांभि
3)बाळकृष्ण राजेंद्रप्रसाद चौबे
4) रहमान अब्दुल रशीद खान
5)हिमांशू सिंग राजवट राव
6)श्याम सिंग जयसिंग चरण
7)अजयकुमार भगवान दास परमार
8) संतराम चंद्रभान शर्मा
9)नरेश विशुभाई चौहान
10) विजयकुमार अर्जुभाई राठोड
11)राजेंद्र कुमार लक्षणदास जारीवाला
12) गट्टा माणेंनी श्रीनिवासा राव
13) आशिष अरुनकुमार पंड्या
14) नारायण सिंग फतेहसिंग चौहान
15) युदवीर सिंग नथुसिंग चौहान
16) क्रांतिसिंग यादराम जाट
17) जेथूसिंह मोहनसिंह सोळंकी
18) कांजीभाई नरनभाई कुटची
19) विनोदकुमार अमृतलाल लिंबाचिया
20) किरणसिंग हालाजी चौहान
21) किरणसिंग अर्जुनसिंग सिसोदिया
22) रमणभाई कोदरभाई पटेल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *