Amfan Cyclone : कोलकात्यात अम्फान वादळाचा धुमाकूळ, 12 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात अम्फान या महाचक्रीवदाळाने हाहाकार माजला (Amfan Cyclone Kolkata) आहे.

Amfan Cyclone : कोलकात्यात अम्फान वादळाचा धुमाकूळ, 12 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 21, 2020 | 1:30 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात अम्फान या चक्रीवदाळाने हाहाकार माजला (Amfan Cyclone Kolkata) आहे. या चक्री वादळाचा वेग ताशी सुमारे 160 ते 180 किमी इतका आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 10 ते 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोलकात्याच्या अनेक भागामध्ये पाणी भरलं आहे. या वादळाचा फटका कोलकाता विमातळालाही बसला आहे. विमानतळाच्या चारही बाजूने पाणी भरलं (Amfan Cyclone Kolkata) आहे.

या एका तासाच्या अम्फान वादळामुळे कोलकाता विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. विमानतळामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी भरलेलं आहे. विमानतळाची धावपट्टी आणि हँगर पाण्याखाली बुडाले आहेत. विमानतळाचा काही भाग तर पूर्ण पाण्याखाली गेला आहे. या वादळामुळे विमानतळारील उड्डाणे आणि इतर कामकाज आज सकाळी पहाटे 5 पर्यंत बंद केले होते. ते अजूनही बंद आहेत.

अम्फान वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशा दोन्ही राज्यात धुमाकूळ घातला आहे. या वादळामुळे झाडे पडली, घराचे छत उडाले, दिव्यांचे खांब तर काडीपेटीतील काड्यांसारखे उडाले आहेत.

बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर हे वादळ धडकल्यामुळे अम्फान वादळाचा वेग ताशी सुमारे 180 किमी इतका होता. अम्फान वादळाचा सर्वात जास्त हाहाकार पश्चिम बंगालच्या उत्तर 2 परगना, दक्षिणी 24 परगना, मिदनापूर आणि कोलकातामध्ये झाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “अम्फान वादळामुळे आतापर्यंत 10 ते 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू झाडे पडल्यामुळे झाला आहे. ओडिशामध्येही तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही राज्यात बचाव कार्य सुरु आहे.”

संबंधित बातम्या :

Amphan cyclone | अम्फान चक्रीवादळाचा चार दिवस प्रभाव, मान्सून महाराष्ट्रात वेळेवरच येणार : हवामान तज्ज्ञ

Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची चिन्हं, केरळात 5 जूनला धडकण्याचा अंदाज

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.