VIDEO : अमित शाहांचा पाय स्लीप, व्हायरल झाल्या क्लिप

  • Sachin Patil
  • Published On - 11:12 AM, 26 Nov 2018
VIDEO : अमित शाहांचा पाय स्लीप, व्हायरल झाल्या क्लिप

मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी शनिवारचा दिवस चांगलाच अडचणीचा ठरला. त्याचं झालं असं की, शनिवारी अमित शाह हे दोनदा पडले. आधी एका रोड शो दरम्यान, त्यानंतर हेलीकॉप्टरमधून उतरताना.

पहिल्यांदा रथातून…

पहिल्यांदा पडले, ते मध्य प्रदेशातील रोड शो दरम्यान. अशोकनगर येथील तुलसी पार्क येथे प्रचाराच्या रथातून उतरताना पाय घसरुन पडले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकाने लगेच त्यांना उठण्यास आधार दिला. या घटनेत सुदैवाने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही.

दुसऱ्यांदा हेलिकॉप्टरमधून…

त्यानंतर आणखी एक बातमी आली की, शाह हे हेलिकॉप्टरमधून उतरताना पडले. मिझोरम येथे पश्चिम तुईपुई विधानसभा क्षेत्रात शाह यांची निवडणूक प्रचार सभा होती. लाबंग गावात त्यांचा हेलिकॉप्टर उतरला आणि हेलिकॉप्टरमधून खाली उतरत असताना त्यांच्याकडून चुकून एक पायरी सुटली. त्यामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते जमिनीवर पडले. त्यांच्या सोबतच्या एका व्यक्तीने लगेच त्यांना उठण्यास मदत केली, त्यांचे कपडे झटकले. या घटनेतही शाहांना सुदैवाने कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर मग काय, ट्रोलर्सनी आपली मोर्चा अमित शाह यांच्याकडे वळवला. मग राजस्थान, मध्य प्रदेश निवडणुकीच्या अनुशंघाने जोक्सचा सुळसुळाट सुरु झाला. कुणी व्हिडीओ एडिट करुन पोस्ट करत होतं, तर कुणी मीम्स करत होतं, काही काळजी व्यक्त करत होते, तर कुणी आणखी काही! आता सोशल मीडियावर विनोदबुद्धीला किती तुफान पेव फुटतो, हे काय आम्ही तुम्हाला सांगायला नको. त्यातीलच काही पोस्ट आम्ही तुम्हाला खाली दिल्या आहेत :