धीरुभाई अंबानी जेव्हा संकटात सापडले, राजीव गांधी यांनी थेट अर्थमंत्र्यांनाच त्यामुळे पदावरुन हटवलं

अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर करणार आहेत. अर्थमंत्र्यांच्या बजेटकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. बजेटमधील प्रत्येक निर्णय हा मोठा परिणाम करणारा असतो. अर्थमंत्र्यांच्या निर्णयामुळे अनेकदा उद्योगपती देखील अडचणीत सापडतात. असाच एक किस्सा आहे धीरुभाई अंबानी आणि अमिताभ बच्चन यांचा. ज्यामुळे ते अडचणीत सापडले होते आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांना नाईलाजाने पदावरुन हटवावे लागले होते.

धीरुभाई अंबानी जेव्हा संकटात सापडले, राजीव गांधी यांनी थेट अर्थमंत्र्यांनाच त्यामुळे पदावरुन हटवलं
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 10:00 PM

मुंबई : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत. देशाच्या बजेटकडे सर्वांचं लक्ष लागून असतं. मग तो सर्वसामान्य माणूस असो की मोठा उद्योगपती. कारण देशाचा बजेट सरळ आपल्या खिशावर परिणाम करत असतो. बजेटमध्ये कधीकधी उद्योगपतींना मोठं नुकसान देखील सहन करावं लागतं. काही अर्थमंत्री तर कधीकधी उद्योगपतींसाठी चिंता वाढवणारे ठरले आहेत. यातच एक नाव म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंह. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये व्ही.पी सिंह हे अर्थमंत्री होते. त्यांच्या एका निर्णयामुळे रिलायन्सचे संस्‍थापक धीरूभाई अंबानी आणि अभिनेते अमिताभ बच्‍चन ( Amitabh Bachaan ) यांची झोपच उडाली होती. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अर्थमंत्री व्ही.पी सिंह ( V P Singh )यांना हटवण्याचा निर्णय घेतला होता.

राजीव गांधी ( Rajeev Gandhi ) यांच्यानंतर जेव्हा व्हीपी सिंह पंतप्रधान झाले तेव्हा पुन्हा धीरुभाई अंबानींच्या चिंता वाढल्या. हा किस्सा खूप कमी लोकांना माहित असेल. 1984 सालची ही गोष्ट आहे. डिसेंबर 1984 मध्ये निवडणुकीनंतर बजेट सादर झाला नव्हता. आठव्या लोकसभा निवडणुकीनंतर व्ही.पी सिंह यांनी अर्थमंत्री म्हणून 1985-86 आणि 1986-87 साठी बजेट सादर केला होता.

व्ही.पी सिंह यांच्या काळात सोन्याच्या स्‍मग्लिंगची प्रकरणे कमी झाली होती. त्यांनी गोल्‍ड टॅक्‍समध्ये सूट दिली होती. सोबतच जप्त केलेलं काही सोनं पोलिसांना देणार असल्याचं जाहीर केलं होतं. अर्थखात्याने प्रवर्तन निदेशालय (ईडी) विभागाला देखील पाठबळ देत काही अधिकार दिले होते. त्यामुळे ईडी टॅक्स चोरी करण्यांवर जोरदार कारवाई करत होती. यानंतर धीरूभाई अंबानी आणि अमिताभ बच्‍चन यांच्यासह अनेक जणांच्या येथे छापे टाकण्यात आले होते. या गोष्टीनंतर राजीव गांधी नाराज झाले. त्यांनी यामुळे व्ही.पी सिंह यांना हटवण्याचा निर्णय घेतला.

व्ही.पी सिंह यांचे धीरुभाई अंबानी यांच्यासोबत संबंध काही चांगले नव्हते. मे 1985 मध्ये व्ही.पी सिंह यांनी अचानक प्‍यूरिफाइड टेरेपथैलिक एसिड आयात करण्यावर बंदी घातली. पॉलियस्‍टर फिलामेंट बनवण्यासाठी याचा वापर होत असते. यामुळे रिलायन्स कंपनी अडचणीत आली. त्यांना उत्पादन करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागला होता.

अंबानी आणि अमिताभ बच्चन हे भारतातील हायप्रोफाईल नावांपैकी एक आहेत. पण यांना देखील त्याकाळात अडचणींचा सामना करावा लागला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.