"मी आलो आहे ना, आता हनीप्रीत-राम रहिमच्या भेटीतील अडचणीही संपतील"

बलात्काराच्या 2 प्रकरणांमध्ये दोषी राम रहिम आणि त्याची सहकारी हनीप्रीत दोघेही (Ram Rahim and Honeypreet meeting) सध्या हरियाणाच्या तुरुंगात बंद आहेत.

Ram Rahim and Honeypreet meeting, “मी आलो आहे ना, आता हनीप्रीत-राम रहिमच्या भेटीतील अडचणीही संपतील”

चंदीगढ : बलात्काराच्या 2 प्रकरणांमध्ये दोषी राम रहिम आणि त्याची सहकारी हनीप्रीत दोघेही (Ram Rahim and Honeypreet meeting) सध्या हरियाणाच्या तुरुंगात बंद आहेत. त्यात राम रहिमला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र, सध्या त्यांच्याकडून एकमेकांना भेटण्याचे (Ram Rahim and Honeypreet meeting) प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यांना यासाठी अनेकदा परवानगी नाकारण्यात आली. आता हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी हनीप्रीत आणि राम रहिम यांच्या भेटीत कोणतीही अडचण येणार नसल्याचं विधान केलं आहे. आता मी आलो आहे, सर्व ठिक होईन, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. त्यामुळे या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त मिळत आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

हरियाणाच्या नवनियुक्त सरकारमध्ये अनिल विज यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. विज यांनी कार्यभार स्वीकारताच हनीप्रीतला राम रहीम यांना भेटण्यातील अडथळे दूर करुन लवकरच परवानगी देण्यात येईन, असं म्हटलं. सध्या याचा तपास सुरु आहे आणि सर्व व्यवस्थित झालं तर लवकरच दोघांनाही भेटण्याची परवानगी देण्यात येईन. सर्व काही कायद्यानुसारच होईन, असंही त्यांनी सांगितलं.

Ram Rahim and Honeypreet meeting, “मी आलो आहे ना, आता हनीप्रीत-राम रहिमच्या भेटीतील अडचणीही संपतील”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिरसा पोलिस प्रशासनाने हनीप्रीत आणि सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गुरमीत राम रहीम यांची भेट झाल्यास सिरसामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ शकतो, अशी शंका व्यक्त करत अहवाल पाठवला आहे.

Ram Rahim and Honeypreet meeting, “मी आलो आहे ना, आता हनीप्रीत-राम रहिमच्या भेटीतील अडचणीही संपतील”

अनिल विज म्हणाले, “मी गृहमंत्री होताच राज्यभरातून माझ्याकडे तक्रारींचा पूर आला आहे. माझा फोन, ई-मेल, व्हॉट्सअॅपपासून सर्व ठिकाणी हजारो तक्रारी येत आहेत. आता अनिल विज आले आहेत. सर्व काही व्यवस्थित होईन.” काही दिवसांपूर्वीच अनिल विज यांनी कायद्यात सर्वांना भेटण्याची परवानगी असल्याचं म्हटलं होतं.

माझ्या घरी आणि कार्यालयात तक्रार देणाऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. मी पोलीस विभागाला प्रत्येक तक्रारकर्त्याला न्याय देण्यास सांगितले आहे. जर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदारांच्या कामात हलगर्जीपणा केलेला असेल तर संबंधित अधिकाऱ्याविरोधात कारवाई केली जाईन. एखादा पोलीस अधिकारी जाणूनबूजून एखाद्या व्यक्तीचं प्रकरण प्रलंबित ठेवत असेन, तर त्याच्यावरही कारवाई केली जाईन, असंही विज यांनी नमूद केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *