हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा; निरंजनी आखाड्याकडून जाहीर

यानंतर निरंजनी आखाड्यानंही कुंभमेळा संपुष्टात आल्याची घोषणा केलीय. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभमेळा संपविण्याची घोषणा केली. End Of Kumbh Mela Haridwar

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:46 PM, 15 Apr 2021
हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा; निरंजनी आखाड्याकडून जाहीर
End Of Kumbh Mela Haridwar

हरिद्वार: गेल्या काही दिवसांपासून देशासह उत्तर प्रदेशातही कोरोनाचा संसर्ग सतत वाढत आहे. हरिद्वार कुंभमेळ्यात भाविक आणि संतांची गर्दी  झाली असून, मोठ्या संख्येनं लोक दररोज कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. यानंतर निरंजनी आखाड्यानंही कुंभमेळा संपुष्टात आल्याची घोषणा केलीय. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभमेळा संपविण्याची घोषणा केली. (Announcing The End Of Kumbh Mela At Haridwar; Announced From Niranjani Akhada)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुंभमेळा संपवण्याचा निर्णय

ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुंभमेळा संपवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणूनच 17 एप्रिल रोजी कुंभमेळा संपेल. बाहेरून आलेल्या सर्व संत, महात्मांना परत जाण्याची विनंती केली गेलीय. 17 एप्रिलपर्यंत कुंभमेळा रिकामा होणार आहे.

इतर आखाड्यांनाही कुंभमेळा संपवण्याचं आवाहन

यावेळी पुरी यांनी इतर आखाड्यांनाही कुंभमेळा संपवण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या हितासाठी हा मेळा संपुष्टात आणणेच योग्य आहे. महंत रवींद्र पुरी यांच्या मते, 27 एप्रिल रोजी महाकुंभ मेळ्याचे शाही स्नान होणार आहे. या महाकुंभमेळ्याचं ते शेवटचं शाही स्नान असेल. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 27 एप्रिल रोजी शाही स्नानही केवळ प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे. ज्यासह महाकुंभ स्नानाची शाश्वत परंपरा कायम राहील.

हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सर्व नियम आणि कायदे पायदळी

हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सर्व नियम आणि कायदे पायदळी तुडवले जात आहेत. या कुंभमेळ्यासाठी आज लाखो लोक जमले. शासन-प्रशासन पूर्णपणे हतबल असल्याचे दिसून येते. कुंभमेळा आता कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनलाय. 5 दिवसात 1700 नवीन संसर्गग्रस्त आढळलेत. रिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.

कुंभमेळा क्षेत्रात संक्रमित व्यक्तींची संख्या 2000 च्या पुढे जाण्याची शक्यता

हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभू कुमार झा म्हणाले की, या संख्येनं हरिद्वार ते देवप्रयागपर्यंत संपूर्ण मेळाव्यात पाच दिवसांत विविध आखाड्यांच्या साधूंनी आणि संतांनी केलेल्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजन या दोन्ही तपासणीचा डेटा समाविष्ट आहे. ते म्हणाले की, आरटी-पीसीआरच्या पुढील तपासणीचे निकाल अजून आलेले नाहीत आणि ही परिस्थिती पाहता कुंभमेळा क्षेत्रात संक्रमित व्यक्तींची संख्या 2000 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Corona Update: अरे देवा! देशातील कोरोना रुग्णावाढीचा वेग 10 दिवसांत दुप्पट; गेल्या 24 तासांत 2,00,739 नवे रुग्ण

Corona Vaccine : देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही, रेमजेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याचे आदेश- डॉ. हर्षवर्धन

Announcing The End Of Kumbh Mela At Haridwar; Announced From Niranjani Akhada