Ashwini Vaishnav Tweet Video | अश्विनी वैष्णव यांच्या ट्वीटरवरील व्हीडीओ व्हायरल – tv9

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी रेल्वे संपूर्ण तयारीत व्यस्त आहे. दोन दिवस प्रमुख स्थानके तिरंग्याच्या रंगात रंगलेली दिसली.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 16, 2022 | 9:40 AM

Ashwini Vaishnav Tweet Video : देशात सर्वत्र ‘आझादी का अमृत महोत्सव’ मोठ्या थाटात करण्यात येत आहे. तर घर घर तिंरगाच्या माध्यमातून देशवासियांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलं आहे. तसेच या उपक्रमात अनेक सरकारी विभागांनी सहभाग नोंदवला आहे. यात सर्वात मोठा देशाची लाईफ लाइन समजल्या जाणाऱ्या रेल्वेचा आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी रेल्वे संपूर्ण तयारीत व्यस्त आहे. दोन दिवस प्रमुख स्थानके तिरंग्याच्या रंगात रंगलेली दिसली. तर स्थानकात तिरंगा लावून आणि गाड्यांही स्टिकर्सने लावून सजवण्यात येणार आहेत. तसेच रेल्वेकडून प्रत्येक रेल्वे स्टेशनवर तिंरग्याच्या रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आता केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यात भारतीय रेल्वेचे इंजन पुर्णपणे तिंरगा रंगात रंगवण्यात आले आहे. या रेल्वेच्या उपक्रमामुळे ‘आझादी का अमृत महोत्सव’ देशभर जाणार.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें