मोदींच्या पंतप्रधानपदाचे भाकित वर्तवणारे प्रख्यात ज्योतिषी बेजान दारुवाला कालवश

बेजान दारुवाला यांनी गुजरातमधील अहमदाबादच्या एका खासगी रुग्णालयात वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मोदींच्या पंतप्रधानपदाचे भाकित वर्तवणारे प्रख्यात ज्योतिषी बेजान दारुवाला कालवश

गांधीनगर : प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं शुक्रवारी (Astrologer Bejan Daruwala Passed Away) निधन झालं. बेजान दारुवाला यांनी गुजरातमधील अहमदाबादच्या एका खासगी रुग्णालयात वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरापासून बेजान दारुवाला हे खासगी रुग्णालयात भर्ती होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. एका आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते. बेजान दारुवाला यांच्या मुलाच्यामते, बेजान दारुवाला यांना निमोनिया होता. तसेच, त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला (Astrologer Bejan Daruwala Passed Away) होता.

बेजान दारुवाला यांचा जन्म 11 जुलै 1931 रोजी झाला. ते पारसी समाजाचे असून त्यांच्या भविष्यवाणीसाठी ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती.

इतकंच नाही तर संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू होईल अशीही भविष्यवाणी त्यांनी केली होती. 23 जून 1980 रोजी संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्याशिवाय, त्यांनी कारगिल युद्ध ते गुजरात भूकंप आणि 2004 मध्ये काँग्रेस सत्तेत येण्यापूर्वी मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी केली होती (Astrologer Bejan Daruwala Passed Away).

अनेक वर्तमानपत्रात ज्योतिषी कॉलम लिहिणारे दारुवाला यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

ते वेगवेगळ्या शास्त्रांच्या माध्यमातून भविष्यवाणी करायचे. ते वैदिक ज्योतिष, न्यूमरोलॉजी, हस्तरेषा पाहणे यासह अनेक शास्त्रांमध्ये तज्ज्ञ होते. ते शेअर मार्केटबाबतही भविष्यवाणी करायचे. त्यांच्या वेबसाईटनुसार ते अमेरिकेचे सर्वश्रेष्ठ ज्योतिषी होते (Astrologer Bejan Daruwala Passed Away).

संबंधित बातम्या :

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

Irrfan Khan | इरफान खान यांचे निधन, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रवास

ज्येष्ठ साहित्यिक ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांचे पुण्यात निधन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *