खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकाला डंपरने चिरडले; हरियाणातील मेवातमधील दुर्घटना

पोलीस उपअधीक्षकांना डंपरने धडक दिल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे. या घटनेनतंर हरिणायाणातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून अनेक जणांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकाला डंपरने चिरडले; हरियाणातील मेवातमधील दुर्घटना
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 3:02 PM

नवी दिल्लीः खाण माफियांकडून अधिकाऱ्यांवर हल्ले करणे, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकार सगळ्या देशभर घडत असतानाच हरियाणातील नूहमध्येही (Haryana Nuh) खाण माफियांकडून पोलीस उपअधीक्षकांना डंपरने चिरडल्याची दुर्घटना नुकतीच घडली आहे. खाण माफियांकडून (Mining Mafia) ज्यांच्या अंगावर डंपर घालून ठार करण्यात आले आहे, त्यांचे नाव पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र बिश्नोई (Police Deputy Superintendent Surendra Bishnoi) असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून अवैध खाणकामावर छापा टाकण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे, त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मात्र खळबळ उडाली आहे.

पोलीस उपअधीक्षकांवर हल्ला झाल्याचे समजताच हरियाणातील वरिष्ठ पोलीस अधिखारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अनेक जणांना ताब्यात घेण्यात येत आहे.

खाण माफियांची गुंडागर्दी

पोलीस उपअधीक्षकांवर हल्ला झाल्याने हरियाणातील खाण माफियांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आला आहे. सुरेंद्र बिश्नोई यांच्या मृत्यूमुळे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हात केला आणि घात झाला

हरियाणातील तवाडू येथे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र बिश्नोई सेवा बजावत होते. त्यावेळी त्यांना तवाडूच्या टेकडीमध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी छापा टाकरण्यासाठी तवडू टेकडीवर आपल्या निवडक पोलिसांसोबत गेले होते. त्यावेळी खाणकाम सुरु असलेल्या खाणीतून एक डंपर दगड भरून येत होता, त्यावेळी त्याला हात दाखवून डंपरला थांबवण्याच्या सूचना करण्यात आल्या, मात्र ड्रायव्हरने डंपर न थांबवता त्याच डंपरने पोलीस उपअधीक्ष सुरेंद्र बिश्रोई यांना धडक दिली, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

डंपर चालक पळाला

पोलीस उपअधीकांवर डंपर घातल्यानंतर संबंधितांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून पोलीस महानिरीक्षक आणि नूहचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाची चक्रे वेगाने सुरु झाली आहेत.

कशी घडली घटना

पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र बिश्रोई यांना सकाळी 11 वाजता अवैध खाणकाम सुरु असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ते साडेअकरा वाजता कर्मचाऱ्यांसह खाणीवर दाखल झाले. पोलिसांचा ताफा तेथे गेला असे समजताच काही जण तिथून आधीच पसार झाले. मात्र एक डंपर खाणीतून बाहेर येत असताना त्याला थांबण्याच्या ज्यावेळी सूचना देण्यात आल्या त्यावेळी डंपर न थांबवता ड्रायव्हरने थेट त्यांच्या अंगावरच चढवले असल्याचे बिश्रोई यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

निघृणतेचा कळस

ज्यावेळी सुरेंद्र बिश्रोईंनी छापा मारण्यासाठी खाणीवर गेले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत निवडकच पोलीस होते, त्यातील प्रत्यक्षदर्शी पोलिसांनी सांगितले की, डंपरला हात दाखवून थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र ट्रक ड्रायव्हरने डंपर न थांबवता तो तसाच त्यांनी पोलीस उपअधीक्षकांच्या अंगावर घातला, आणि त्यांच्या दुप्पट वेगाने तो निघूनही गेला, त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

हरियाणात पुन्हा एकदा माफियाराज

हरियाणात खाण माफियांकडून हल्ले होण्याचा हा काही पहिलाचा प्रकार नाही, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. सोनपतमध्येही अशाच प्रकारचा हल्ला पूऱ्या टीमवर करण्यात आला होता. सोनपथच्या हल्ल्यात तर अधिकाऱ्यांसह बरोबर गेलेल्या शिपायालासुद्धा बेदम मारहाण करुन त्यांला गंभीर जखमी करण्यात आले होते, तर एका पोलिसाला त्याची वर्दी फाटेपर्यंत मारहाण करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.