Bajrang Dal Nationwide Protest : उद्या देशभरात बजरंगल दलाचं आंदोलन, राष्ट्रपतींनाही निवेदन देणार, मुस्लिम संघटनांना रस्त्यावर उतरुन उत्तर?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) शी संलग्न असलेल्या संघटनेच्या वतीने, गुरुवारी देशभरातील जिल्हा प्रशासनाच्या मुख्यालयात "इस्लामी जिहादी कट्टरपंथीयांकडून वाढत्या अतिरेकी कारवायांविरोधात" युवा शाखेचे कार्यकर्ते निदर्शने करतील, असे सांगण्यात आले.

Bajrang Dal Nationwide Protest : उद्या देशभरात बजरंगल दलाचं आंदोलन, राष्ट्रपतींनाही निवेदन देणार, मुस्लिम संघटनांना रस्त्यावर उतरुन उत्तर?
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 4:25 PM

नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहंमद पैंगबर यांच्यावर वादग्रस्त विधानानंतर देशात जोरदार राजकारण पेटलं होतं. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या शर्मा यांनी एका टीव्ही वाहिनीवरील चर्चेत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून देशभरातील मुस्लीम समाज आक्रमक झाला. मुस्लीम समाजाकडून नवी दिल्लीतील जामा मशिदीत, हैदराबाद आणि उत्तर प्रदेशातील सहरानपूर, प्रयागराज आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूर आणि परभणीत निदर्शनं करण्यात आली. तर याचे पडसाद प.बंगालमध्येही उठले जेथे भाजपचे कार्यालय जाळण्यात आले. या झालेल्या हिंसाचारावर आता बजरंग दल (Bajrang Dal) उद्या देशभरात निषेध करणार आहे. तसेच हिंसाचाराच्या (Violence) विरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनही देणार आहे.

याबाबत मंगळवारी, विश्व हिंदू परिषदेने जाहीर केले होते की बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून देशाच्या काही भागात हिंसक घटना झाल्या होत्या. त्या झालेल्या हिंसक घटनांविरोधात बजरंग दलाचे कार्यकर्ते हे आंदोलन करतील. बजरंग दल आता उद्या म्हणजेच गुरुवारी देशव्यापी निदर्शने करणार आहे. तसेच वादग्रस्त धार्मिक वक्तव्यावरून नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनही देणार आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) शी संलग्न असलेल्या संघटनेच्या वतीने, गुरुवारी देशभरातील जिल्हा प्रशासनाच्या मुख्यालयात “इस्लामी जिहादी कट्टरपंथीयांकडून वाढत्या अतिरेकी कारवायांविरोधात” युवा शाखेचे कार्यकर्ते निदर्शने करतील, असे सांगण्यात आले. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

10 जून रोजी जामा मशिदीत निदर्शने

भारतीय जनता पक्षाचे माजी नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीच्या निषेधार्थ गेल्या आठवड्यात 10 जून रोजी दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली होती. याशिवाय उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह देशातील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. वाद वाढल्यानंतर भाजपने या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. झारखंडमध्येही आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात काही पोलीस जखमी झाले, तर जम्मूमध्ये काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये, आंदोलकांनी कथितपणे पोलिसांवर दगडफेक केली, त्यानंतर सुरक्षा दलांना त्यांच्यावर लाठीमार करावा लागला आणि अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर करावा लागला होता.

देशभरातील हिंसाचार पाहून विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “विहिपची युवा शाखा बजरंग दल आता देशातील इस्लामिक जिहादी कट्टरपंथीयांकडून वाढत्या अतिरेकी घटनांविरोधात रस्त्यावर उतरणार आहे.” ते म्हणाले, “बजरंग दलाचे कार्यकर्ते उद्या सर्व जिल्हा मुख्यालयावर धरणे देतील आणि जिहादी अतिरेक्यांकडून हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात राष्ट्रपतींना निवेदन सादर करतील.”

‘हिंसाचार भडकावणाऱ्यांना अटक करावी’

मिलिंद परांडे यांनी अशीही मागणी केली की, ज्या मशिदींमधून जमाव कथितपणे शुक्रवारच्या नमाजानंतर निघून गेला आणि 10 जून रोजी त्यांनी देशाच्या काही भागात हिंसाचार केला त्या मशिदींवर कडक नजर ठेवली पाहिजे. “ज्यांनी जमावाला भडकावले त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ज्यांना धोका निर्माण झाला आहे, त्यांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. धमक्या देणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.” विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) दिल्ली युनिटने सोमवारी शहरातील लोकांना मंदिरांमध्ये जमून हनुमान चालिसाच्या सामूहिक पठणात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.