प्रसिद्ध लॉबिस्ट नीरा राडियावर 300 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप, ईडब्ल्यूकडून गुन्हा दाखल

नीती राडिया (niira radia) या नयाती हेल्थकेअरच्या अध्यक्ष आणि प्रवर्तक आहेत. ज्या 2जी प्रकरण आणि वादग्रस्त टेप प्रकरणामुळे चर्चेत होत्या.

प्रसिद्ध लॉबिस्ट नीरा राडियावर 300 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप, ईडब्ल्यूकडून गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 4:07 PM

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईडब्ल्यू) गुन्हा नोंदवत नयाती हेल्थकेअरसह दोन कंपन्यांविरूद्ध तपास सुरू केला आहे. नीती राडिया (niira radia) या नयाती हेल्थकेअरच्या अध्यक्ष आणि प्रवर्तक आहेत. ज्या 2जी प्रकरण आणि वादग्रस्त टेप प्रकरणामुळे चर्चेत होत्या. यामध्ये ईडब्ल्यूने दोन कंपन्यांविरोधात 300 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. (bank fraud fir against corporate lobbyist niira radia and 3 others for funds embezzlement)

मिळालेल्या माहितीनुसार, ईओडब्ल्यूच्या एफआयआरनुसार, गुरुग्रामच्या हेल्थ कंपनीबरोबरच नारायणी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांची नावं समोर आली आहेत. या दोन्ही कंपन्यांम्धेय 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला आहे. नयती आणि नारायणी यांच्यावर गुरुग्राम आणि विमहंस रुग्णालय या दिल्लीतील हॉस्पिटलमधील योजनांमध्ये 2018 ते 2020 दरम्यान 312.50 कोटी रुपयांचा फेरफार केल्याचा आरोप आहे.

बँकेच्या कर्जातून कोटींचा गैरव्यवहार दिल्लीचे ऑर्थोपेडिक सर्जन राजीव के. शर्मा यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कंपन्यांनी विविध प्रसिद्धस कंत्राटदारांच्या नावावर बनावट खाती उघडून कर्जाची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये टाकली. या बँक कर्जामधून कोट्यवधींचे गैरव्यवहार केले आहेत.

कोण आहे नीरा राडिया? नीरा राडिया ही एक प्रसिद्ध लॉबीस्ट आहे. नीरा यांनी अवघ्या 15 वर्षांत अब्जाधीश झाल्या. फक्त 2जी घोटाळ्यासह अनेक महत्त्वपूर्ण घोटाळ्यांमध्ये त्यांचं नाव आहे. यामुळे देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनाही आपण निर्दोश असल्याचा पुरावा कोर्टात सादर करावा लागला.

इतर बातम्या – 

राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, महागात पडेल : चंद्रकांत पाटील

नोकरभरती ते मेडिकल प्रवेश, विनायक मेटेंच्या मुख्यमंत्र्यांकडे 9 मागण्या

(bank fraud fir against corporate lobbyist niira radia and 3 others for funds embezzlement)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.