विंग कमांडर अभिनंदन यांचं BCCI कडून हटके स्वागत

नवी दिल्ली : संपूर्ण देशाने भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं जल्लोषात स्वागत केले. भारतीय क्रिकेटचं प्रशासकीय मंडळ असलेल्या बीसीसीआयनेही हटके पद्धतीने भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं. ट्विटरवर टीम इंडियाच्या जर्सीचा फोटो पोस्ट केला असून, त्या जर्सीवर ‘विंग कमांडर अभिनंदन’ असे इंग्रजीत लिहिले आहे. ही पहिल्या क्रमांकाची जर्सी आहे. “तुम्ही आकाशावर राज्य …

विंग कमांडर अभिनंदन यांचं BCCI कडून हटके स्वागत

नवी दिल्ली : संपूर्ण देशाने भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं जल्लोषात स्वागत केले. भारतीय क्रिकेटचं प्रशासकीय मंडळ असलेल्या बीसीसीआयनेही हटके पद्धतीने भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं. ट्विटरवर टीम इंडियाच्या जर्सीचा फोटो पोस्ट केला असून, त्या जर्सीवर ‘विंग कमांडर अभिनंदन’ असे इंग्रजीत लिहिले आहे. ही पहिल्या क्रमांकाची जर्सी आहे.

“तुम्ही आकाशावर राज्य करणारे आहात आणि तुम्ही आमच्या हृदयावरही राज्य करणारे आहात. तुमचं धाडस आणि एकनिष्ठता येणाऱ्या सर्व पिढ्यांना प्रेरणा देईल.” असेही बीसीसीआयने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

भारताचा ढाण्या वाघ परतला!

पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर  अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं.  पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची पिस्तुल परत करत, मानाने त्यांना पाठवलं. सीमेवर जवळपास 8 तासांची औपचारिकता पूर्ण करुन अभिनंदन भारतात परतले.

प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द – Welcome Home Abhinandan

वाघा बॉर्डरवर भारतीय वायू दलाच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांचं स्वागत केलं. यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. दरम्यान, पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक भारतीय अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देण्यात आला. कारण, दोन वेळा अभिनंदन यांना सुपूर्द करण्याची वेळ बदलण्यात आली. अखेर सव्वा नऊ वाजता त्यांनी वाघा बॉर्डरहून भारतीय भूमीवर पहिलं पाऊल ठेवलं.

भारतात येण्यापूर्वी अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत, छेडछाड केलेला व्हिडीओ शेअर

अभिनंदन यांना वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीला नेलं जाईल. त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी होईल. कारण, त्यांनी विमान अपघातातून स्वतःची सुटका करुन घेतली होती, अशी माहिती भारतीय वायूसेनेकडून देण्यात आली.

27 फेब्रुवारीपासून ते पाकिस्तानच्या ताब्यात होते, मात्र भारताने पाकिस्तानची कोंडी करत, अभिनंदन यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा दिला होता. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कालच त्यांच्या संसदेत शांततेची भेट म्हणून विंग कमांडर अभिनंदन यांना सोडणार असल्याची घोषणा केली होती.

जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!

दरम्यान, भारताने आज वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट रद्द केली. भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरसह बालाकोट इथं दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्ताननेही F16 या अमेरिकन बनावटीच्या विमानांसह 27 फेब्रुवारीला भारतीय हवाई सीमेत घुसखोरी करुन भारतीय तळांवर बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पाकिस्तानी विमानांना हुसकावून लावताना, अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं विमान पाडलं. त्याचवेळी विंग कमांडर अभिनंदन यांच्या विमानालाही अपघात झाला आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी आर्मीच्या ताब्यात सापडले. तेव्हापासून ते पाकिस्तानच्या ताब्यात होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *