वरमाला घालण्याआधी वधूला आला हार्ट अटॅक, वराती ऐवजी निघाली अंतयात्रा

लग्नमंडपात वरमाला घालण्याआधी वधूला हार्ट अटॅक आल्याने एकाच खळबळ उडाली. कुठे घडली ही घटना?

वरमाला घालण्याआधी वधूला आला हार्ट अटॅक, वराती ऐवजी निघाली अंतयात्रा
हार्ट अटॅकने वधूने निधन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 11:08 AM

लखनौ, लखनौच्या भदवाना गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वरमाला घालण्यासाठी निघालेल्या वधूचा अचानक मृत्यू झाला. लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. वधूला (Bride) लगेच रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शुक्रवारी भदवाना गावात राहणाऱ्या विवेक आणि शिवांगी यांचा लग्नसोहळा थाटात सुरु होता. मंडपात सनई चौघड्यांच्या सूर आणि मंगलमय वातावरणात लग्नाचा विधी सुरु होता. वराचे मित्र आणि नातेवाईक बँडच्या तालावर नाचत होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. स्टेजवर मंगलाष्टक सुरु होते वरमाला घेण्यासाठी वाढू सज्ज होती मात्र त्याआधीच तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला (Died By Heart attack).

क्षणात होत्याचे नव्हते झाले

वरमाला घालण्यासाठी वधू समोर सरसावली आणि क्षणात खाली कोसळली. कुटुंबीयांनी शिवांगीला उठविण्याचा प्रयत्त्न केला.  तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले मात्र काहीच उपयोग झाला नाही. भर लग्नमंडपात वधूला हार्ट अटॅक आल्याने एकाच गोंधळ उडाला. वधूला घेऊन तात्काळ रुग्णालय गाठले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून  शिवांगीला मृत घोषित केले. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे काही क्षणातच आनंदाचे रूपांतर दुःखात झाले.

हे सुद्धा वाचा

 दोन आठवड्यांपासून प्रकृती होती खराब

आपल्या मुलीच्या मृत्यूने दु:खी झालेल्या राजपाल यांनी सांगितले की, शिवांगीची प्रकृती दोन आठवरुणपासून खराब होती. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच तिला तापही होता. शिवांगीच्या पश्चात तिची आई कमलेश कुमारी, लहान बहिणी सोनम, कोमल आणि भाऊ अमित असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. एका नवीन जीवनाची सुरुवात होण्याआधीच त्याचा दुर्दैवी अंत झाला.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.